माणसांचा मृत्यू दोन टप्यांमध्ये होतो. पहिला टप्पा म्हणजे शारीरिक मृत्यू व दुसरा म्हणजे पेशीच्या पातळीवरील या अणूरेणूंच्या पातळीवरील मृत्यू. मेंदूहृदय व फुप्फुसे यांचे कार्य पूर्णपणे थांबण्याला शारीरिक मृत्यू असे म्हणतात. शारीरिक मृत्यू झाला तरी देखील शरीरातील काही भागांमध्ये मात्र प्राण शिल्लक असतो. त्यामुळे ते रासायनिकऔष्णिक वा विद्युत संवेदनांना प्रतिसाद देतात. डोळ्यांत मरणानंतर अॅट्रोपीन टाकले. तर बाहुली मोठी होते व फायजोस्टीग्मीन टाकले तर लहान होते. वेगवेगळ्या पेशी व ऊती त्यांना किती प्राणवायू लागतो त्या प्रमाणावर वेगवेगळ्या कालावधीपर्यंत जिवंत राहतात. या पेशी व पेशींचा समूह त्याला पेशींचा मृत्यू असे म्हणतात. यात शरीरातील सर्व पेशी मरायला लागतात व त्याबरोबर शरीर थंड होऊ लागते. याच बरोबर डोळेत्वचा व स्नायू यांतही बदल घडून येतात. शारीरिक मृत्यूनंतर सुमारे तीन ते चार तासांत पेशीचा मृत्यू होतो. शरीराचे स्नायू विद्युत संवेदनांनी उत्तेजित झाले नाहीततर पेशींच्या पातळीवर मृत्यू झालेला आहे असे निदान करता येते.

काही वेळा पेशींचा मृत्यू झालेला नसल्यास चितेवर ठेवलेल्या प्रेताची हालचाल होऊ शकतेज्यामुळे गोंधळ उडू शकतो. इंद्रियारोपणाच्या शस्त्रक्रियेतही पेशींचा मृत्यू व्हायच्या आधी ते इंद्रिय शरीरातून काढावे लागते. यकृत शारीरिक मृत्यूनंतर १५ मिनिटांतमूत्रपिंड ४५ मिनिटांततर हृदय एक तासात लागतेअन्यथा या इंद्रियांचा दुसऱ्याच्या शरीरात रोपण करण्यासाठी उपयोग करता येणार नाही. माणूस एकदा मरतोहे जरी खरे असले तरी तो दोन टप्यांत भरतो. एकदा शारीरिक पातळीवर तर एकदा पेशींच्या पातळीवर !

डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन 

Previous Post Next Post