बुध ग्रह
बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर फक्त ५७, ९०९१७५ किलोमीटर. ( 0.38709893 A. U.) आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ प्लूटो ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत. मरीनर १० हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढून पृथ्वीवरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले.
बुध ग्रह कक्षीय गुणधर्म :
अपसूर्य बिंदू ; ६,९८,१६,९०० कि.मी. - ०.४६६६९७ खगोलीय एकक
उपसूर्य बिंदू : ४,६०,०१,२०० कि.मी. - ०.३०७४९९ खगोलीय एकक
अर्धदीर्घ अक्ष : ५,७९,०९,१०० कि.मी. - ०.३८७०९८ खगोलीय एकक
वक्रता निर्देशांक : ०.२०५६३०
परिभ्रमण काळ : ८७.९६९१ दिवस (०.२४०८४६ वर्ष)
सिनॉडिक परिभ्रमण काळ : ११५.८८ दिवस
सरासरी कक्षीय वेग : ४७.८७ कि.मी./से.
कक्षेचा कल : ७.००५° (३.३८° सूर्याच्या विषुववृत्ताशी)
असेंडिंग नोडचे रेखावृत्त : ४८.३३१°
उपसूर्य बिंदूचे अर्ग्युमेंट : २९.१२४°
कोणाचा उपग्रह : सूर्य
सरासरी त्रिज्या : २,४३९.७ कि.मी.
फ्लॅटनिंग : < ०.०००६
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ : ७.४८ × १०७ कि.मी.² (पृथ्वीच्या ०.१०८ पट)
घनफळ : ६.०८३ × १०१० कि.मी.³ (पॄथ्वीच्या ०.०५४ पट)
वस्तुमान : ३.३०२२ × १०२३ किलोग्रॅम (पृथ्वीच्या ०.०५५ पट)
सरासरी घनता : ५.४२७ ग्रॅ./सें.मी.³
पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण (विषुववृत्ताजवळ) : ३.७ मी./से.² ०.३८ g
मुक्तिवेग : ४.२५ कि.मी./से.
सिडेरियल दिनमान : ५८.६४६ दिवस (५८ दिवस १५ तास ३० मि.)
विषुववृत्तावरील परिवलनवेग : १०.८९२ कि.मी./तास
आसाचा कल : ०.०१°
परावर्तनीयता : ०.११९
पृष्ठभागाचे तापमान : ८५° उ., ०° प.
किमान सरासरी कमाल
८०के २००के ३८०के
वातावरण :
पृष्ठभागावरील दाब : अतिशय कमी
संरचना :
३१.७% पोटॅशियम
२४.९% सोडियम
९.५% आण्विक ऑक्सिजन
७.०% आरगॉन
५.९% हेलियम
५.६% ऑक्सिजन
५.२% नायट्रोजन
३.६% कार्बन डायॉक्साईड
३.४% पाणी
३.२% हायड्रोजन
बुध हा पृथ्वीच्या चंद्राप्रमाणेच असून त्यावर फारसे वातावरणही नाही. या ग्रहाला लोहाचा गाभा असून त्यामुळे पृथ्वीच्या १% इतके चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्याच्या पृष्ठभागावरचे तापमान ८० ते ७०० केल्विन(-१८० ते ४३० सेल्सियस) इतके असते. बुधाच्या सूर्यासमोरील भागाचे तापमान सर्वांत जास्त, तर ध्रुवावरील विवरांच्या तळाशी सर्वांत कमी तापमान असते.
रचना :
बुध हा सूर्यमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ या चार घन पृष्ठभाग असणाऱ्या ग्रहांपैकी एक आहे (इतर ग्रहांचे पृष्ठभाग द्रवरूप किंवा गोठलेल्या द्रवरूपांत आहेत), व त्यांच्यामध्ये आकारमानाने सर्वांत लहान आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणेच खडकाळ आहे. त्याचा विषुववृत्ताजवळ व्यास हा ४८७९ कि.मी. आहे. बुध हा ७०% धातू तर ३०% सिलिका यांचा बनला आहे. घनतेच्या बाबतीत तो सूर्यमालेत दुसर्या क्रमांकावर आहे. त्याची घनता ही ५४३० कि.ग्रॅ./घन मी. इतकी असून ती पृथ्वीच्या घनतेपेक्षा थोडीशी कमी आहे.
परिभ्रमण कक्षा व परिवलन :
बुध हा ८८ दिवसात सूर्यप्रदक्षणा करतो. त्याचा वेग तासाला १,८०,००० किलोमीटर पडतो.
परिवलनाचा (स्वतःभोवती फिरण्याचा) काळ - ५९ दिवस.
बुधाचा रास बदलण्याचा काळ अनियमित असतो.
उदा. : २५ डिसेंबर २०१९ पासून धनु राशीत असलेला बुध १३ जानेवारीला २०२० रोजी मकर राशीत आला. (धनु राशीत मुक्काम १९ दिवस)
३० जानेवारी २०२० ला तो कुंभ राशीत गेला. (मकर राशीतला मुक्काम - १८ दिवस)
७ एप्रिल २०२० रोजी मीन राशीत गेला. (कुंभ राशीत तो ६९ दिवस होता).
१७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२० या २३ दिवसांच्या काळात तो वक्री होता.
२४ एप्रिलला मेष राशीत प्रवेश. (मीन राशीतला मुक्काम १८ दिवस)
९ मेला वृषभ राशीत प्रवेश. (मे़ष राशीतला मुक्काम १६ दिवस).
२४ मेला मिथुन. (वृषभ राशीतला मुक्काम १६ दिवस)
१ ऑगस्ट २०२० रोजी कर्क राशीत प्रवेश. (मिथुन राशीतला मुक्काम ७० दिवस). १८ जून ते १२ जुलै २०२० या ४२ दिवसांच्या काळात बुध वक्री होता.
१६ ऑगस्ट २०२० रोजी सिंह राशीत प्रवेश. (कर्क राशीतला मुक्काम १५ दिवस).
२ सप्टेंबर - कन्या. (सिंह राशीतला मुक्काम १७ दिवस).
२२ सप्टेंबर २०२० ला तुला राशीत प्रवेश. (कन्या राशीतला मुक्काम २० दिवस).
२७ नोव्हेंबरला वृश्चिकप्रवेश. (तुला राशीतला मुक्काम ६६ दिवस). (वृश्चिक राशीत बुध २० दिवस होता.)
१४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या ४६ दिवसांच्या काळात बुध वक्री होता.
१७ डिसेबरला बुध धनूत जाईल आणि तेथॆ तो १९ दिवस होता.
सूर्यमालेतील बुध हा सूर्या नंतरचा पहिला ग्रह. हा आकाराने आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे. याचा व्यास ४, ८७८ कि. मी. आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असल्यामुळे यास आंतर ग्रह देखिल म्हणतात. म्हणजेच तो सकाळी आणि संध्याकाळीच दिसतो. याचा अर्थ तो नेहमीच दिसतो असे नाही. वर्षभरात फक्त काही काळच तो दिसतो. तो देखिल सूर्यापासून दूर असताना, अन्यवेळी सूर्यप्रकाशात लुप्त झाल्यामुळे त्याचे दर्शन होत नाही.
या ग्रहावर वातावरण नसल्याने उल्कावर्षावाने हा ग्रह फारच खडबडीत झालेला दिसतो. या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण कमी असल्याने यावर वातावरणाचा अभाव जाणवतो.
बुध ग्रह साधारणतः ५९ दिवसामध्ये स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास त्यास ८८ दिवस लागतात. सूर्यापासून अत्यंत जवळ म्हणजे फक्त ५७, ९०९१७५ कि. मी. ( 0.38709893 A. U.) अंतरावर असल्याने या ग्रहाचे सूर्याच्या बाजूकडील असलेल्या भागाचे तापमान ४२० अंश सेल्सिअस एवढे प्रचंड असते तर याउलट सूर्याच्या त्याच्या विरुद्ध बाजूकडील तापमान अत्यंत थंड म्हणजेच -२०० अंश सेल्सिअस असते. या दोन्ही तापमानात कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही.
बुधचा सूर्याभोवतीचा भ्रमणाचा मार्ग हा दीर्घ वर्तुळाकृती आहे. तसेच सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या भ्रमणावर मोठा परिणाम होतो. बुधाच्या सूर्यप्रदक्षिणा भ्रमणमार्गामध्ये नेहमीच थोडा थोडा बदल होत असतो. म्हणजेच एकदा एका भ्रमणमार्गावरून फिरल्यावर बुध ग्रह त्या मार्गास सोडून दुसर्या मार्गावरून भ्रमण करतो.
काही वेळेस बुधाचे सूर्यावरील अधिक्रमण पाहावयास मिळते. अधिक्रमण म्हणजे सूर्य-पृथ्वी यांच्यामध्ये सरळ रेषेत ज्यावेळेस बुध ग्रह येतो त्यावेळेस बुध ग्रहाचा छोटासा ठिपका सूर्य बिंबावरून पुढे सरकताना दिसतो. एका शतकामध्ये बुधाची १३ अधिक्रमणे पाहावयास मिळतात. म्हणूनच हे अधिक्रमण अतिशय दुर्मिळ समजले जाते.
बुध ग्रहास एकही चंद्र नाही. याच कारण बहुदा सूर्यापासून त्याचे कमी अंतर असावे. काहीवेळेस पृथ्वीवरून बुधाच्या कलादेखील पाहावयास मिळतात.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक