माते ज्यांच्यासाठी केलेस तु कष्ट दिनरात,
तिच तुझी लेकरे आज नाही एका विचारात,
एवढीच खंत आहे माझ्या उरात,
तुच सांग माते कधी येऊ आम्ही एका घरात
गुणगाण त्या रमाईचे कोटी मुखाने गावे,
तरीपण त्या माऊलीचे कौतुक कमीच व्हावे,
अनमोल एक हिरा ती देऊन भीमाई गेली,
परि त्या हि-यास पैलू पाडून तियेने जावे...
गरिबी जरी त्या संसारात होती
रमाची भिमाला तरी साथ होती
भिमराव होते दिव्याच्या समान
आणी त्या दिव्याची रमा वात होती.
सांग सांग रमाई तुझे कसे ग फेडू पांग
या नवकोटी जनतेवरी तुझी माया अथांग
तूच दिला आम्हाला एक नवा कोरा सूर्य
आताशी कुठे उजाडलं, दिली कोंबड्यान बांग
सांग सांग रमाई तुझे कसे ग फेडू पांग...
रमाई तु खरंच मोराचा पिसारा.
उभ्या जिवनासाठी तुच मायेचा पसारा
तुझ्या जाळीदार छायेखाली जन्माचा निवारा
माता रमाई...
लिहिता ना येई “अ, आ, इ, ई "
तरी घडविला या देशाचा संविधानकारी
अशी होती आडाणी माझी माता रमाई
काय गाऊ मी तिची नवलाई त्याग कीर्ती
गाता अरविंदाचे डोळे डबडबून जाई
- भीमसैनिक अरविंद बनसोडे, पोर्ट ब्लेअर
पै पैसा लावन्या भिमाला
तिने थापल्या कित्येक गवऱ्या
फाटक्या लुगड्यात नांदली रमाई तवा
शालूत नटल्या या आजच्या नवऱ्या
प्रेम तर सगळेच करतात पण,
जिच्याकडून,ममता मिळते
तिला माता रमाई म्हणतात.
तेलाने तर दिवे सगळेच लावतात.
पण जो पाण्याला आग लावतो त्यांना,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात !!
त्यागालाही वाटावी लाज,
असा माई तुझा त्याग
तुझ्या त्यागानेच निर्माण झाला,
आम्हा लेकरांचा अभिमान!
प्रेतं लेकरांची उचलून खांद्यावरती,
कशी राहिली ती माय,
साऱ्या समाजाचं पोट भरणाऱ्या,
त्या भिम दुधावरची साय !
शिवमंत्र... परस्त्री माते समान
तिच्यात आहे आपुलीच आई,
गुणगान गावे तेवढे थोडेच
ती सावित्री माई आणि रमाई!!
आयुष्यभर कष्ट जिच्या वाट्याला,
तिच्या मुळे फुलपण आम्हां काट्याला,
कसे फेडू पांग, कसे होऊ उतराई,
कोटी कोटी लेकरांची आई रमाई
माय... तुझं स्वप्न होतं ना,
पंढरी पाहयाचं
इंथचं मानवतेचीच पंढरी उभी केली,
बा भिमानं...
माय, जागला गं, बा...
तुला दिलेल्या शब्दाला
मात्र आज आम्ही नाय जागलो,
बा... भिमाच्या शब्दाला
बाबासाहेबांच्या कार्याला रमाईचा लागला हातभार
म्हणून चालवू शकले भीमराव देशाचा कारभार
गरिबीच्या संसारात दिली मोलाची साथ
संयमाने दिली त्यांनी नेहमी संकटावर मात
माया, ममता अन् प्रेम त्यागाची
होती माय तू ग मूर्ती
कोणीही विसरू नाही शकणार
रमाई माऊलीची कीर्ती
- वर्षा भोळे
भिमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात
केली हिंमतीने प्रत्येक संकटावर मात
पुण्यवान, धैर्यशील, हिंमतवान बाई
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई...
ती होती मायेची सावली मातृत्वाची ओवी,
माझ्या भिमाची रामू दिनदुबळ्यांची रमाई...
माता रमाई...
माझ्या भिमाची सावली
दिन दलितांची आई
अशी भाग्यशाली त्यागमुर्ती
माझी आई माता रमाई...
कष्ट सोशिले अपार
भिमाची बनून सावली
सदा हसत मुखाने राहली
माझी माता रमाई माऊली
कवी - अविनाश पवार
मातोश्री रमाई भिमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक