गोवर रुबेला घोषवाक्ये

निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड

न चुकता शाळेत जाऊया लसीकरणाला साथ देऊया

लसीकरणाने साथ देऊया देश गोवर-रुबेलामुक्त करुया

भविष्य सुरक्षित करु पाल्याचे हेच असे महत्व लसीकरणाचे

भावी पिढी असे देशाची शान सफल करू गोवर रुबेला अभियान

एखादे महत्वाचे काम टाळा MR लस न विसरता द्या बाळा

बाळ राहील सदा गुटगुटीत हेच असे लसीकरणाचे गुपीत

गोवर रुबेला पळवून लावूया चला लसीकरणाला जाऊया

यशस्वी करू गोवर रुबेला अभियान याने वाढेल निरोगी भारताची शान

सुजाण कर्तव्यदक्ष नागरिक व्हा पाल्याचे MR लसीकरण करून घ्या

चला करू भारत गोवर रुबेला मुक्त तरच घडेल भावी पिढी सशक्त

MR लसीचे देऊन इंजेक्शन भावी पिढीचे करू या रक्षण

न चुकता लसीकरण करूया गोवर रुबेलाची लागण टाळूया

लसीकरणाला देऊन सर्वांनी साथ चला करूया गोवर रुबेलावर मात

पाल्य आपली आयुष्याची संपत्ती लसीकरणाने दूर होईल त्याच्यावरील आपत्ती

न चुकता द्या बाळाला MRची सुई गोवर रुबेलापासून बाळ दूर राही

एकही क्षणाचा विलंब नको लसीकरणाकडे आता दुर्लक्ष नको

सर्वजण जनजागृतीची वाट धरू चला गोवर रुबेलाचा नायनाट करू

लसीकरणाचे वापरता हत्यार गोवर रुबेला होईल कायमचा फरार

MR लस द्या लाडक्या बाळा गोवर रुबेलाचा धोका टाळा