कोरोना घोषवाक्ये

कोरोना घोषवाक्ये

कोरोनाला घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका. 

धूम्रपान टाळा, मद्यपान टाळा, कोरोना संसर्गाला बसेल आळा.

डॉक्टरांच्या सल्ल्याने मास्क वापराकोरोना विषाणूंना देऊ नका थारा

संतुलित संतुलित आहाराचे सेवन, देई कोरोनापासून संरक्षण.

आपले हात स्वच्छ ठेवा, साबणाने वरचेवर धुवा.

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, कोरोना विषाणूपासून स्वतःला सांभाळा.

नियमित वापराच्या वस्तू स्वच्छ करा, कोरोनाचा फैलाव दूर सारा.

सार्वजनिक वस्तूंचा वापर टाळा, तरच बसेल कोरोनाला आळा.

शिंकताना नाकातोंडासमोर रुमाल धरा, कोरोनापासून बचावाचा हाच उपाय खरा.

डोळे, कान, नाकाला वारंवार स्पर्श करू नका,

कोरोना विषाणू प्रसारास वाट देऊ नका.

सर्दी, फ्ल्यू असलेल्या लोकांचा टाळा संपर्क, योग्य काळजी घेऊन राहू या सतर्क.

!! घ्यावयाची काळजी !!

1) साबण व स्वच्छ पाणी वापरून किमान 20 सेकंदांपर्यंत आपले हात स्वच्छ धुवा.

2) सर्दी, फ्ल्यू किंवा सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी जास्त जवळीक व संपर्क टाळा.

3) शिंकतांना / खोकलतांना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरावे.

4) शिंकणाऱ्या विद्यार्थ्याला मास्क वापरण्यास सांगावे.

5) गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

6) आजारी व्यक्तीच्या संपर्कात जाऊ नये.

7) मोबाईल, हेडफोन, रुमाल इ. सारख्या इतरांच्या वस्तू वापरू नयेत.

8) आपले डोळे, नाक, कान यांस हाताने वारंवार स्पर्श करू नये.

9) सार्वजनिक वापरातील वस्तू नियमित स्वच्छ ठेवाव्यात.

10) आजाराची लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड