संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड
झाडे लावा, झाडे जगवा.
पर्यावरण जगवा, वसुंधरा वाचवा
वृक्ष लावा दारोदारी, आरोग्य येईल घरोघरी
दारी वृक्षाचा पाहारा, देऊ पक्षाला आसरा
हवी असेल गर्द सावली, लावा झाडे पावलोपावली
वृक्ष लावा, जिवन वाचवा
झाडेच झाडे लाऊया, फळे फुले वेचूया
झाड म्हणतं या रे या, फळं- फुलं सावली घ्या
कावळा करतो कावकाव, म्हणतो माणसा झाडे लाव
झाडे लावू भारंभार, शिवार होईल हिरवेगार
एकच आस जपा उरी, प्रेम असावे तरू वरी
सुंदर नक्षी, आकाशात पक्षी, विकासास पर्यावरण साक्षी
पुढील पिढीसाठी ठेवू वारसा, तरू वेली दाखवतील आरसा
वसुंधरेचे हिरवे लेणे, लावा वने वाचवा वने
वसुंधरा आमची छान, चला राखू तीचा मान.
झाडे लावा, जीवन वाचवा, या धरतीला स्वर्ग बनवा
झाडे ही माणसाचे मित्र, उगारू नका त्यांच्यावर शस्त्र
वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी
हवी असेल पर्जन्यवृष्टी, वृक्षांनी सजवा सृष्टी
धरती मातेचे रुण, फेडू करून वृक्षारोपण
वृक्ष सारखा पवित्र, नसे कोणी दुजा मित्र
झाडे वाढवा चैतन्य फुलवा, पृथ्वीला नंदनवन बनवा
आता चालवा एकच चळवळ, लावा वृक्ष करा हिरवळ
जर नसेल पृथ्वीवर वृक्ष, तर जीवन बनून जाईल रुक्ष
झाडे आहेत कल्पतरू संरक्षण त्यांचे नित्य करू
हाक देतसे धरती आई, जतन करूया वनराई
पाणी अडवा पाणी जिरवा, जीवनबागेत हिरवळ फुलवा
नव्या युगाचे नवे आराधन, सतत करूया वनसंवर्धन
राखा पर्यावरणाचा समतोल, जाणा वृक्षारोपणाचे मोल
वृक्षाचे करा संवर्धन, धरतीचे होईल नंदनवन
अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई कळस
वृक्ष बोले माणसाला, नका तोडू आम्हाला
कर वृक्षावर माया, मिळेल थंडगार छाया
वृक्ष आमचा सगासोयरा, तोचि आमचा मित्र खरा
उठा उठा, चला चला, झाडे लावू गावाला
वाळवांटीकरणाचा शत्रू थोपवा, कागद वाचवा
वृक्ष वाचवा, पर्यावरण जगवा
भारत समृध्द बनवूया; वसुंधरेला वाचवूया
जेथे झाडे उदंड, तेथे पाऊस प्रचंड
करण्या वसुंधरेचे रक्षण, असंख्य रोपाचे करू रोपण
होऊ आपण सर्व एक, लावूया रोपे अनेक
झाडांना द्या साथ, प्रदूषणावर करतील मात
हिरवा परिसर जीवन नवे, एक तरी झाड लावायलाच हवे
जेथे घनदाट वृक्षराजी, तेथे पावसाची मर्जी
कराल झाडावर माया, तर मिळेल दाट छाया
वृक्ष हा मानवाचा जीवनदायी मित्र आहे