बालहक्क सुरक्षितता घोषवाक्ये

बालहक्क सुरक्षितता घोषवाक्ये

संकलन : गिरीष दारूंटे, मनमाड 

शिक्षण हा माझा हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच

मुलांच्या हक्काचे करूया रक्षण, हेच खरे प्रगतीचे लक्षण 

बालमजुरीला घालूया आळा, शिक्षण हक्क देऊया बाळा 

हक्क शिक्षणाचा, बाल रक्षणाचा

बालविवाहाला घालूया आळाशिक्षण हक्क देऊया बाळा

आधुनिक शिक्षण, बालकाचे लक्षण.

टाळूया सारे प्रलोभन, करण्या बालक संरक्षण,

मुलींना शिक्षण देवुया, अंधकार घरातला टाळु या

जपुया विद्यार्थी हित, गाऊया प्रगतीचे गीत

मुलींना शिक्षणाचा स्रोत, जीवनात ठरेल आनंदाची ज्योत 

खाल गाजर, मुळे तर होतील सुंदर डोळे

आपली सुरक्षा, आपल्या हातात

सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या, सर्वाना समानतेची संधी द्या 

न चुकता शाळेत जाऊया, देशाच्या प्रगतीला साथ देऊया

शिक्षणाची साथ घेऊया, देश निरक्षरमुक्त करूया

भविष्य सुरक्षित करू पाल्याचे, हेच असे महत्व शिक्षणाचे

भावी पिढी असे देशाची शान, सफल करूया RTE अभियान

एखादे महत्वाचे काम टाळा, जि. प. शाळेतच प्रवेश द्या बाळा

अज्ञान अंधकार पळवून लावूया, चला शाळेत जाऊया

यशस्वी करू RTE अभियान, वाढवूया देशाची शान

न चुकता शाळेत जाऊया, गळती स्थगितीची लागण टाळूया 

विज्ञानाला देऊया साथ, चला करूया अंधश्रद्धेवर मात

एकही क्षणाचा विलंब नको, शिक्षणाकडे आता दुर्लक्ष नको 

सर्वजण शिक्षणाची वाट धरू, चला अज्ञानाचा नायनाट करू

बालमजुरी टाळा, शिक्षण द्या लाडक्या बाळा

हक्काचे शिक्षण देऊया, देशाचा विकास करु या.

नाही राहणार आम्ही गाफील२१ व्या शतकातील शिकू स्किल

शिक्षणाला नाही बंधने वयाचे, हक्काचे शिक्षण देशहिताचे

सुजाण, कर्तव्यदक्ष नागरिक व्हा, पाल्याचा मराठी शाळेतच प्रवेश घ्या 

पाल्य आपली आयुष्याची संपत्ती, शिक्षणाने दूर करू त्याच्यावरील आपत्ती

बालहक्क रक्षणाचे घेऊनी कष्ट, मुलांच्या हाती सुरक्षित राहील राष्ट्र

घोषवाक्ये निर्मिती

सदस्य: EDUCATION PDF FILE समूह, सातारा