वाचन प्रेरणा दिन घोषवाक्ये

संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड

• वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल

• जिथे जिथे दिसते पुस्तक, तिथे व्हावे नतमस्तक

• जिथे पुस्तकांचा साठा, समृद्धीचा नाही तोटा

• वाचन करता मिळते ज्ञान, उंचावते जीवनमान

• पुस्तकांशी करता मैत्री, ज्ञानाची मिळते खात्री

• वाचनाने समृद्ध होते मती, मिळते आमच्या विकासाला गती

• ग्रंथ हे आपले गुरु, वाचनासाठी हाती धरू

• वाचन करा वाचन करा, हाच खरा ज्ञानाचा झरा

• वाचनालयाला देऊ आकार, कलामांचे स्वप्न करू साकार

• एक एक वाचू पुस्तक, गर्वोन्नत होईल मस्तक

• वाचनसंस्कृती घरोघरी, तिथे फुले ज्ञानपंढरी

• वाचनाचा जपा नाद, ज्ञानाचा नको उन्माद

• वाचता वाचता मिळते ज्ञान, अनुभव हाच गुरु महान

• पुस्तके वाचून मिळते ज्ञान, ज्ञानासह समाजाचे भान