कहाणी शब्दांची... गंमत अक्षरांची !!
मित्रांनो मराठी ही आपली मातृभाषा आहे. ती आपल्याला कोणी शिकवावी लागत नाही, आपण सहज बोलतो लिहितो... थांबा... थांबा हे कसं शक्य असेल? तर मित्रांनो आपल्यापैकी अनेक जण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतं असाल म्हणून बोलले हो... आपण मराठी बोलतो, लिहितो त्यातील सर्व अक्षरे आपणांस ज्ञात आहेत परंतु व्यवहारी भाषेतील अनेक शब्दांचे आपणांस अर्थ माहीत असती असे मी गृहीत धरते. परंतु त्या शब्दांची निर्मिती, उत्पत्ती आपणांस ठाऊक असेलच असे नाही.बरं... का मित्रांनो मराठी भाषेतील शब्दांच्या गमंतीदार कहाण्या आहेत आपण 'असे ही काही... कहाणी शब्दांची... गंमत अक्षरांची!!' या सदरात आपण रोज एका शब्दाची कहाणी ऐकणार आहोत वाचणार आहोत. तर चला आज धोतर आपण या शब्दांची कहाणी वाचणार आहोत.
असं म्हटलं जातं की ज्या प्रदेशाची जशी प्राकृतिक रचना असते तसाच तेथील पेहराव असतो. आपला महाराष्ट्र सह्याद्रिचा राखट रांगडा असा आहे. आपल्या शिवरायांचा महाराष्ट्र यास डोंगर-दऱ्या, कडेकपाऱ्या चढ-उतार करणारे आपले मावळे, मावळे नव्हे तर समस्त पुरुष वर्गाच्या पोशाखातील वस्त्र प्रकार म्हणजेच धोतर. सध्या हाच वस्त्रप्रकार कुठेतरी लयाला चाललेला आहे. धोतर हे नेसले जाते, घातले जात नाही आणि धोतर नेसणे ही एक कला आहे बरं का, आता तुम्ही म्हणाल की या वस्त्राला धोतरच का म्हटले जाते. किंवा धोतरचंअसे का म्हणायचे तर त्याचे असे आहे की कमरेखालचे वस्त्र या अर्थाने आपण धोतर हा शब्द वापरला जातो. कमरेखालच्या वस्त्राला अधोवस्त्र असं म्हटलं जाई परंतु खेड्यातील बाप्पांना म्हणजेच पुरुषांना ते उच्चारताना अवघड जाई अशावेळी ते जमेल तसे म्हणण्याचा प्रयत्न करीत. कधी धोवस्त्रार तर कधी धोसतार असे म्हणायचे आणि असे म्हणता म्हणता अधोवस्त्र-धोवस्त्रार-धोसतार -धोतार-धोतर असे म्हणता म्हणता अधोवस्त्रचे... धोतर कधी झाले हे कळलेच नाही म्हणजेच अधोवस्त्र या शब्दांचा हा अपभ्रंश असलेल्या शब्द म्हणजे धोतर आहे .हा मराठीजनांचा आवडता पोशाख आहे. मित्रांनो आहे ना गंमत या धोतर या शब्दांची आणि कशी वाटली कहाणी या धोतर या शब्दांची असेच अनेक शब्दांंच्या कहाण्या आपण या सदरात पाहणार आहोत तर ऐकायला आणि वाचायला विसरू नका 'असे ही काही... कहाणी शब्दांची... गंमत अक्षरांची.'
🌿आस
लेख Audio स्वरूपात ऐका
व डाऊनलोड करा