सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ओक्टोंबर १८७५ रोजी गुजराथ मधील खेडा जिल्ह्यातील करमसाड खेड्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झवेरभाई पटेल आणि आईचे नाव लाडबाई असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण करमसाड या गावी झाले. पेतलाड येथील एकां शाळेत ते दाखल झाले. दोन वर्षा नंतर ते नडीयादच्या हायस्कूल मध्ये आले. बालपणा पासून करारी व अन्यायाची चीड असलेल्या वल्लभभाईनि शाळेत असताना एका मारकुट्या गुरुजीं विरुद्ध विद्यार्थ्यांना संघटीत करून सतत तीन दिवस संप घडवून आणण्याचे आक्रित केले व त्या गुरुजींना नरमाई ने वागायला लावले.
विद्यार्थी दशेतच त्यांचा जव्हेरबाईंशी विवाह झाला. दहावी झाल्यावर घरच्या गरिबीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेण्याकरीता पैसा साठवू लागले. पुरेसे पैसे साठताच आपले वडीलबंधू विठ्ठलभाई यांना ते पैसे देऊन त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले. १९०९ साली त्यांच्या पत्नी चे निधन झाले. विठ्ठल भाई बॅरिस्टरी करून आल्यावर वल्लभभाई इंग्लंडला ले, आणि बॅरिस्टरीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण करून मायदेशी परत आले व अहमदाबाद ला वकिली करू लागले. वकिलीत भरपूर पैसा कमावून ते वैभवशाली जीवन जगू लागले. पण महात्माजींच्या सहवासात येऊन त्यांनी वकिली सोडून देश्याच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांनी असहकाराच्या चळवळीत भाग घेतला व कारावास भोगला.
अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी त्या शहरात अनेक सुधारणा व सोई केल्या गुजरात विद्यापिठाची स्थापना केली. १९२७ साली अतिवृष्टीमुळे गुजरात मध्ये जलप्रलय झाला असता, त्यांनी पुरग्रस्तासाठी केलेले सहाय्य तर चीरस्मरणीय ठरते. १९२८ साली बार्डोलीस केलेल्या करबंदी चळवळीचे नेतृत्व स्वीकारून त्यांनी ब्रिटीश सरकारला नमविले. त्यामुळे लोक त्यांना " सरदार पटेल " असे संबोधु लागले.
१९३१ साली कराची येथे भरलेल्या अखिल भारतीय कॉंग्रेस च्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. १९४२ च्या भारत छोडो चळवळीसाठी भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास घडला. २ सप्टेंबर १९४६ रोजी स्थापन झालेल्या मध्यवर्ती हंगामी मंत्रीमंडळात ते भारताचे पहिले गृहमंत्री होते. ते घटना समितीचेही सदस्य होते. १५ ऑगष्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. तेव्हा सरदार पटेल उपपंतप्रधान बनले. त्यांच्या कडे गृह, माहिती आणि प्रसारण तसेच घटक राज्यासंबधीचे प्रश्न हि खाती सोपविण्यात आली. पण देशाची फाळणी झाली पटेलांना या गोष्टीचे फार दुःख झाले. भारतातील लहान मोठी संस्थाने संघराज्यात सामील करण्याचे फार मोठे कार्य सरदारांनी केले.
निजामचे हैद्राबाद संस्थान त्यांनीच भारतात विलीन करून घेतले. सुप्रसिद्ध सोरटीसोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. ते मंदिर सर्वांना खुले केले. ते देशसेवेमुळे अमर झाले. देश हे एकच कुटुंब आहे अश्या भावनेनेच ते वागत. मात्र आपण "गृह मंत्री” 'असतानाच गांधीजींची हत्या झाली. ' हि गोष्ट त्यांच्या मनाला अतिशय लागली. मग लवकरच हृद्य विकाराचा झटका येउन ते आजारी पडले. व त्यातच त्यांचे १५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले.
बारडोलीचे सरदार, गुजराथ चे सिंह, भारताचे लोहपुरुष, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील सेनापती, भारताच्या एकतेचे शिल्पकार आणि पहाडाप्रमाणे सुदृढ ईच्छाशक्ती धारण करणारे वल्लभभाई पटेल इहलोकांतून गेले. त्यावेळी त्यांचे वय ७५ वर्ष होते. आपण त्यांचे आदराने स्मरण करूया !
!! स्मृतीस कोटी कोटी प्रणाम !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक