'पू' कशाचा बनलेला असतो?
'पू' हा शब्द उच्चारताच तुम्हाला किळस आली असेल! तुम्ही नाकही मुरडले असेल! 'पू' म्हणजे शरीरातील टाकाऊ पदार्थांचा अर्क वा कचराच जणू. यात शरीरातील पांढर्या व लाल रक्तपेशी तसेच इतर पेशी मृतावस्थेत असतात. याखेरीज जंतू व पांढऱ्या रक्तपेशी यांच्या लढाईनंतर मेलेले जंतू, पेशी व इतर द्रव्ये असतात. 'पू' पेशीही असतात. छोट्या फोडांमध्ये पू होतो. जंतूसंसर्गाचा हा परिणाम असतो. शस्त्रक्रियेच्या टाक्यांमध्ये, जखमांमध्ये जंतुसंसर्ग होऊन पू जमा होतो. पू जमा झाल्यास ताप येतो. थकवा येतो. बरे वाटत नाही. त्यामुळे कोठेही पू तयार झाल्यास तो शरीराबाहेर काढणे महत्त्वाचे असते. तसे न झाल्यास शरीराच्या आतील भागात असणाऱ्या ठिकाणचा पू वाहेर पडून रक्तात मिसळतो व जंतुसंसर्ग रक्तामार्फत शरीरभर पसरतो. मेंदूवर परिणामही होतो. प्रसंगी मृत्यू ओढवतो. त्यामुळे पू दिसल्याबरोबर तात्काळ खातमा करणे महत्त्वाचे पू मधील जंतूंचा प्रकार पाहून त्यानुसार जंतुघ्नचा वापर करावा लागतो.
साभार : डॉ. अंजली दिक्षीत व डॉ. जगन्नाथ दिक्षीत यांच्या पुस्तकातून...