खरुज एक त्वचा रोग आहे जे सार्कोप्टीस स्केबीज नावाच्या एका परोपजीवाने (parasite) होतो. हे एक ०.३ एम एम एवढ्या लहान कीटकाने होते, ज्याला माईट (अत्यंत लहान जीव) असे म्हणतात. मादा परोपजीव आपल्या त्वचेच्या खाली बीळ खोदून संक्रमणाच्या 2-3 तासाच्या आत अंडी देण्यास सुरू करते आणि सुमारे 2-3 अंडी रोज घालते. ही अंडी उबवून दहा दिवसात मोठे जीव होतात ( हा शब्द परोपजीवाच्या ऐवजी वापरतात). खरुज हे एक सुमारे सांसर्गिक संक्रमण आहे जे एका छोटाश्या जीवामुळे होते (सार्कोप्टीस स्केबीज).
प्रसार :
एका व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीला संक्रमण त्वचेच्या संसर्गात आल्याने होते. बहुधा जेव्हां एक जोडपे रात्री एकत्र असले तर. शक्यतः संक्रमण झालेले अंथरूण-पांघरूण वापरल्याने, संक्रमण झालेले कपडे वापरल्याने, किंवा रोजचे शिवा- शिवी जसे हात देणे किंवा हात पकडणे.
मादा परोपजीव आपल्या त्वचेच्या खाली बीळ खोदून संक्रमणाच्या काही तासांमध्ये अंडी देण्यास सुरू करते आणि सुमारे 2-3 अंडी रोज घालते. ही अंडी उबवून दहा दिवसात मोठे जीव होतात. लक्षण म्हणज़े, प्राथमिकतेने खाज, जे संक्रमणाच्या सुमारे चार आठवड्यांमध्ये दिसण्यास सुरू होते, कारण अप्रगल्भ जीवांचे अस्तित्व असल्यामुळे जागरुक होते.
स्केबीज असलेल्या व्यक्तीला तोपर्यंत संक्रमक म्हटले जाते जोपर्यंत त्यांचा उपचार होत नाही. संक्रमण झालेले कपडे आणि अंथरूण-पांघरूण धुतल्या जाण्यापर्यंत संक्रमक असतात. उपचार झाल्यानंतर, एक व्यक्ती खरुज झालेल्या किंवा सध्या असलेल्या व्यक्तीकडे जाऊन, नकळत परत संक्रमण करून घेऊ शकतात.
लक्षणे :
जीवाणूंचे बीळ असल्याने, लालसर तपकिरी गाठ किंवा जखम, आणि निरंतर खाज. खाज बहुतेक रात्री जास्त होते. खरजेमुळे नेहमी होणारे अधिक खाज हे त्वचेतच होणार्या प्रतिक्तियेने होते. पहिल्यांदा ज्या व्यक्तीला खरुजची लागण होते, त्यांना कोणतेही खाजाची लक्षणे काही आठवडे दिसून येत नाही (चार ते सहा आठवडे). परत परत लागण झाल्यास, पहिले जीव जंतू आपल्या शरीरात आल्या बरोबरच काही तासांमध्येच खाज सुरू होते. यद्यपि हे जीव मनुष्य त्वचा पासून थोडाच वेळ (तीन दिवस) जिवंत राहू शकतात, एकमेकांचे कपडे किंवा अंथरूण वापरल्याने खरुजचे जीव जवळ असणार्यांना किंवा घरच्या लोकांना पसरू शकते. मे २००२ मध्ये, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने खरुजला लैंगिक संबंधातून पसणार्या आजारांच्या उपचाराच्या मार्गदर्शिकेच्या यादी मध्ये सामिल केले आहे.
माहितीस्त्रोत : whatsapp समूह