ONLINE शिक्ष की Pg3 शिक्षण

                करोनाच्या या काळामध्ये शिक्षणाचे आणि शिक्षण क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षभर शिक्षक, शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यावर फारसे लिहिणे झालेच नाही, कारण प्रत्येक गोष्ट शिकवण्याची असो अथवा कोणाशी संवाद साधणे असो ऑनलाईनच फक्त झाले आह. यामध्ये  शाळेत साजरे होणारे कार्यक्रम असो वा वार्षिक स्नेहसंमेलन इतर काही स्पर्धा यांचा ऑनलाईन घेण्यात आल्या आणि यामुळे स्पर्धाची रेलचेल होती. रोज नवीन स्पर्धांची लिंक आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला आपल्या मेल आयडीवर  येत होती आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत. 

परंतु हे होत असताना आपण पालक, विद्यार्थी, शिक्षक एक विसरलो की करोनाच्या काळामध्ये आपण ऑनलाइन शिक्षण हे तरतूद होती जी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात मग्न ठेवण्यासाठी त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी या तरतुदीच्या आपण कितपत आहारी जाणे योग्य आहे हे तुम्हीच ठरवा....

कारण ऑफलाइन शिक्षण याला तोड नाही. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा ऑफलाइन शिक्षणामधून म्हणजेच शाळेतून साधला जातो. ऑनलाइन शिक्षण यामध्ये आपण पालकांचा ,विद्यार्थ्यांचा शिक्षकआणि मीडिया यांचा रोल महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांना आपण सोशल मीडिया पासून थोडे अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. तर सद्य स्थितीत विद्यार्थी हे सोशल मिडियाच्या आहारी गेलेले दिसतात. याचा कोणीही विचार करत नाही परंतू भविष्यात आपल्याला याची किंमत तर नक्की मोजावी लागेल.एक शैक्षणिक वर्ष संपून दुसरे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे.पहिल्या शैक्षणिक वर्षांमध्ये सरकारने ऑनलाईन शिक्षणाची मार्गदर्शक तत्त्वे सगळ्यांना जाहीरपणे सांगितले होती.परंतु या वर्षी मात्र असे काही झालेले दिसत नाही, आणि त्यामुळे ऑनलाईन शाळा भरवण्याचा कित्तेक शाळांनी शिक्षण संस्थांनी घाट घातला आहे. 

Online शाळा म्हणजे काय तर पूर्व प्राथमिक,प्राथमिक आणि माध्यमिकचे  हे विद्यार्थी जवळजवळ पाच तास मोबाईल ,कम्प्युटर, लॅपटॉप त्यांच्यासमोर असतात आता पाच तास स्क्रीन समोर जर विद्यार्थी असतील तर त्यांच्या डोळ्यांचे आणि मानसिकतेचे काय? हाल होत असतील हे पालकांनी समजून घेतले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांची आणि शाळेची धमकीवजा नियम असा आहे की तुम्ही जर पाच किंवा चार तासिकेला हजर असाल तरच तुमच्या पूर्ण दिवसाची उपस्थिती ग्राह्य धरली जाईल. आता हा नियम पालक आणि विद्यार्थी कसोशीने पाळायचा प्रयत्न करतात, त्यामध्ये मुलांच्या मानसिकतेचा ना पालक, शाळा आणि शिक्षक कोणीही विचार करत नाहीत. हे शाळेचे चार पास तासझाले की विरंगुळा म्हणून मुले टीव्ही बघतात मोबाईल वर गेम खेळतात कारण त्यांच्यात हातातच असतो. मुले जास्तीत जास्त वेळ मोबाईल टीव्ही लॅपटॉपवर ही घालवतात दुसरे खेळ खेळणे दुरापास्त झाले आहे अशा वेळेला मुलांना पण ऑनलाइन शिक्षण देतोय कि pg3 शिक्षण देतोय हेच कळत नाही. मुलांचं वय हे कोवळे आहे. त्यांचे विचार सशक्त होण्यासाठी ऑफलाईन शाळेमध्ये चे शिक्षण दिलं जायचं ते योग्य रीतीने दिले जात होते. ऑनलाईन शिक्षणा मध्ये आपण विद्यार्थ्यांना video दाखवण्यावर भर दिला जातो. लोकांनी हवे तसे व्हिडिओ युट्युब अपलोड केलेले आहेत आणि हे videos आपण मुलांना पाहण्यास सांगतो...

पण त्याचा दर्जा काय आहे ?

युट्युब वर अपलोड केलेल्या प्रत्येक video हा मुलांसाठी योग्य आहे का ?

अनेक शैक्षणिक  video पण आहेत व त्याच्यामध्ये प्रमाण भाषा वापरली का की फक्त वाचून दाखवला आहे. अतिरिक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे का त्याची शहानिशा न करता त्याची लिंक पाठवून दिली जाते हे कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही. जर शिक्षकांना online शिक्षणाची जबाबदारी दिली आहे तर त्या शिक्षकांनी स्वतः काहीतरी नावीन्यपूर्ण करून विद्यार्थ्यांना आपल्या विषयांमध्ये खेळवून ठेवणे हे शिक्षकांचे काम आहे, कर्तव्य आहे. तर दुसऱ्याचे video दाखवणे हे कितपत योग्य आहे. Online शिक्षणामध्येही  शिक्षकाचा कस लागायला हवा आणि तेच शिक्षकांनी करण्याची गरज आहे. सध्या एक शिक्षक म्हणून एक पालक म्हणून निरीक्षण करते तेव्हा असे लक्षात येतं की ज्याच्या पासून  मुलांना इतके वर्ष अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने केला त्याच्याच आहारी मुलं जात आहेत.

        सध्या मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम हा वादाचा मुद्दा झालेला आहे. सरकारने जाहीर केलं की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच देणे गरजेचे आहे. त्याची सगळी कारणं त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन इथे सांगण्याची तशी इथे  गरज नाही. त्यावर माझे शब्दांकित केलेले पुस्तक आहे. डॉ. दोषी यांचे "हुशार मुले जन्मतील" ते आपण वाचू शकता. विद्यापीठातून इंजिनिअरिंगचे शिक्षण हे मराठी माध्यमातून घेता येईल ही बातमी वर्तमानपत्रात वाचली आता शालेय शिक्षण  इंग्रजीतून देणार आणि इंजीनियरिंग शिक्षण मराठीतून घेता येणार किती विरोधाभास आहे.

आज महानगरपालिकेच्या शाळा जिथे गरीब विद्यार्थी शिकतात इथे तुम्ही सी बी आय  इंग्रजी माध्यमाच्या शाळा सरकार करत आहे आणि एकीकडे उच्च शिक्षण मराठीतून देण्याची घोषणा करत आहे शिक्षण क्षेत्रामधले सुशिक्षित आहेत की अशिक्षित आहेत हेच कळायला मार्ग नाही. मराठी माध्यमाचे विद्यार्थी कमी होत चाललेत मराठी शाळा टिकल्या पाहिजेत एकीकडे आपण म्हणतो आणि दुसरीकडे त्याच मराठी शाळांच्या जागी तुम्ही इंग्रजी शाळा तिथे सुरू करता सीबीएसईच्या शाळा सुरू करता एकीकडे उच्च माध्यमिक शिक्षण मराठीतून देते विद्यापीठातून आणि एकीकडे हे  मातृभाषेतून शिक्षणाच्या सगळे दरवाजे बंद करता. हा घोळ शिक्षणविभागाचा म्हणायचा कि सरकारच्या शिक्षणाविषयीच्या भूमिकेचा हे किती उदासीन आहे यावरून दिसून येते. 

सरकार शिक्षण क्षेत्राला एवढं महत्त्व देत नाही हे सिध्द होते. कारण बारावीचा निकाल दहावीचा निकाल शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती असो कुठलीतरी गोष्ट जाहीर करताना त्याचा योग्य अभ्यास कारणे गरजेचे आहे. झोपेतून उठून कुठलाही निर्णय शिक्षणाविषयीचा जाहीर करता अर्थात तुम्ही विचारविनिमय करून करत असाल परंतु तो कितपत योग्य आहे याचा विचार शिक्षण विभागाने , सरकारने करणं गरजेचे आहे. 

     गेल्या वर्षी ऑनलाइन शिक्षण घ्या म्हणून सांगतात आणि त्याचे मार्गदर्शक तत्वे जाहीर करतात तसेच यावर्षी ही करणे गरजेचे होते. आज कोवळ्या मनाची कवळ्या डोळ्यांची पुढे काय अवस्था होईल याचा विचार नेत्रतज्ञ यांना विश्वासात घेऊन सरकारने करावा, नाही तर पुढची पिढी  काही दिवसांनी आंधळी होऊ शकते  बहिरी होऊ शकते याचा विचार आपण सर्व का करत नाही. अरे online शिक्षण आहे टेक्निकल प्रॉब्लेम्स यात येऊ शकतात येतात शिक्षक का समजून घेत नाहीत. यावेळी शिक्षक पालक विद्यार्थी शिक्षण विभाग सरकार यांनी जर योग्य पद्धतीने विचार केला तर  online शिक्षणही समृद्ध होईल. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला शिक्षक न्याय देऊ शकतील. अशा प्रकारचे सहज शिक्षण हे विद्यार्थ्यांना ही आवडेल, भरमसाठ लिंक भरमसाठ ऑनलाईन मार्गदर्शन व्याख्यान ऑनलाइन कार्यक्रम भरमसाठ हे घेण्यापेक्षा छोटे-छोटे विद्यार्थ्यांना कंटाळा येणार नाही. असे छोटे छोटे कार्यक्रम या शाळांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी घेतले. तर हे शिक्षण आनंददायी बनेल विद्यार्थ्यांना याचा कंटाळा येणार नाही.

तुम्ही शिकवण्याच्या तासिका छोट्या छोट्या  तासिका घ्या विद्यार्थ्यांना शिकवा. यासाठी चाळीस मिनिटात देणे गरजे नाही हा ज्या वेळेस विचार शिक्षक करतील संस्था करतील शाळा करतील. त्यावेळेस हे online शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आनंददायी होईल याचे शिक्षण विभागाने सरकारने शिक्षण संस्थाचालकांनी जरूर विचार करणे गरजेचं आहे म्हणून म्हणते विद्यार्थ्यांना pg3 शिक्षण देऊ नका तर तुम्ही त्यांना सर्वांगीण विकासाचे विकासासाठी योग्य ते शिक्षण या काळामध्ये देणे महत्वाचे आहे.

आस...

Previous Post Next Post