महत्वाचे मानार्थी शब्द

पुढील वाक्ये नीट वाचा व रंगीत शब्दांकडे लक्ष दया.

(१) आकाश निळे आहे.

(२) आभाळ भरून आले.

(३) गगन सदन, तेजोमय.

(४) अंबर झुंबर झाले.

(५) नभ मेघांनी आक्रमिले.

(६) 'ख' मध्ये गमन करतो,  खग (पक्षी).

आकाश म्हणजेच आभाळ म्हणजेच गगन म्हणजेच अंबर म्हणजेच नभ म्हणजेच .

• वरील सर्व शब्द एकाच अर्थाचे आहेत.

एकाच अर्थाच्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात.

• म्हणून, आकाश, आभाळ, गगन, अंबर, नभ व ख हे सर्व समानार्थी शब्द आहेत.

समानार्थी शब्दांची यादी अभ्यासुयात...

अचंबा = आश्चर्य, नवल, विस्मय

ग्रंथ = पुस्तक

अतिथी = पाहुणा

अपराध = गुन्हा, दोष

अंग = देह, शरीर, काया, कुडी, तनू

अंत = शेवट 

आई = माता, माय, जननी

आकाश = आभाळ, नभ, गगन, अंबर,

आनंद = हर्ष, खुशी, समाधान जीवन

आयुष्य = जीवन

आरसा = दर्पण, ऐना

आज्ञा = हुकूम, आदेश

ऋतू = मौसम

ओढा = झरा, नाला

ओळख = परिचय

कार्य = काम, काज

कीर्ती = ख्याति, प्रसिद्धी

क्रीडा = खेळ

गंध = वास, दरवळ, परिमळ

गर्व = अहंकार, ताठा

गाणे = गीत, गान, कवन

दगड = खडक, पाषाण, शिला, गोटा

गाव = खेडे, ग्राम कहाणी

गोष्ट = कथा

घर = गृह, निकेतन, आयतन, आलय

चक्र = चाक

चव = गोडी, स्वाद

चौकशी = विचारपूस 

छंद = नाद, आवड

जग = दुनिया, विश्व

जमीन = भू, भूमी, भुई, धरती व

जंगल = अरण्य, कानन, विपीन, वन

झोप = निद्रा

डोंगर = पर्वत, गिरी, अद्री

तुरुंग = कारखाना, बंदिवास

थट्टा = मस्करी, चेष्टा

दगड = खडक, पाषाण, शिला, गोटा

दागिना = अलंकार, भूषण

दिवस = दिन, दिस

देखावा = दृश्य

दौलत = संपत्ती, धन

मुख = तोंड, वदन, चेहरा

मैत्री = दोस्ती

राग = क्रोध, कोप, संताप

राघू = पोपट, रावा, शुक

सावली = छाया

सुविधा = सोय

सूत = धागा, दोरा

सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, मार्तड,

सोने = सुवर्ण, कांचन, हेम

सण = उत्सव

शेत = शिवार, वावर

स्थान = ठिकाण, सहाण ठाव

साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा

नदी = सरिता

शर्यत = स्पर्धा, होड, चुरस

शिक्षा = दंड, शासन

वृक्ष = झाड, तरू

नमस्कार = वंदन, नमन

नाव = होडी, गलबत

निश्चय = निर्धार

निर्मळ = स्वच्छ, पवित्र, मंगल

निर्झर = झरा, धबधबा

नियम = कायदा, चाल, पद्धत, रीत

नृत्य = नाच

नोकर = दास, का

पद = पाय, पाऊल, काव्य

परिश्रम = कष्ट, मेहनत

पर्वा = चिंता, काळजी, धास्ती ,

पक्षी = पाखरू, खग, विहंग

प्रजा = लोक, रयत, जनता

प्रवास = सफर, यात्रा

वाट = मार्ग, रस्ता

वारा = वात, पवन, हवा, मारुत

वीज = विद्युत, सौदामिनी, चपल

विद्या = ज्ञान

विश्रांती = विशेष, आराम

रेखीव =

सामर्थ्य = शक्ती, ताकद, जोम ,

भरवसा = विश्वास

भांडार = साठा, संग्रहालय

मनाई = बंदी, निर्बंध

महान = थोर, मोठा

मंदिर = देऊळ, देवालय

माथा = मस्तक, डोके, शिर, शिखर ,

लग्न = विवाह, परिणय

वस्त्र = कपडा, पट, वसन

वृत्ती = स्वभाव

प्राणी = पशू, वनचर

पाऊस = वर्षा, पर्जन्य, वृष्टी

फूल = पुष्प, सुमन

बाग = बगीचा, उद्यान, वाटिका

सम्राट = बादशहा

बाप = पिता, वडील, जनक

वेल = लता

     निर्मिती : सौ. कल्पना चव्हाण, नाशिक     

Previous Post Next Post