विशेषण     

पुढील शब्दसमूह वाचा व अधोरेखित शब्दांकडे लक्ष द्या.

■ निळे आकाश - ( आकाश कसे ? निळे )

■ दहा चिमण्या - ( चिमण्या किती ? दहा )

■ ती गाय - (कोणती गाय ? ती )

विशेषण म्हणजे काय ?

■ नामा बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात.

■ म्हणून वरील शब्द समूहात निळे, दहा, ती हे शब्द विशेषणे आहेत.

विशेषणाचे प्रकार

■ गुण विशेषण

■ संख्या विशेषण

■ सार्वनामिक विशेषण

     गुण विशेषण     

नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण, विशेषता दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण म्हणतात.

देखणा पक्षी,

मोठे धरण,

हसरा चेहरा,

यामध्ये देखणा, मोठे, हसरा ही गुण विशेषणे आहेत.

     संख्या विशेषण     

ज्या विशेषणाचामुळे नामाची संख्या दाखविली जाते त्या विशेषणाला संख्या विशेषण म्हणतात.

दुसरा मुलगा,

पुष्कळ खुर्च्या,

थोडी वर्षे

यातील दुसरा, पुष्कळ, थोडी ही संख्या विशेषणे आहेत.

     सार्वनामिक विशेषण     

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण म्हणतात.

तो चित्रपट,

तसला आंबा,

कसला रंग,

तुझी शाळा

यामधील तो, कसला, तसला, तुझी ही सार्वनामिक विशेषणे आहेत.

पुढील विशेषण प्रकारातील शब्द नीट अभ्यासा

गुणविशेषण

मंजुळ आवाज

सुंदर वही

कडक ऊन

राखाडी रंग

संख्या विशेषण

तिसरा क्रमांक

थोडे पोहे

काही पक्षी कमी तास

सार्वनामिक विशेषण

तिचे घड्याळ

हिची शाळा

त्याचे घर

एवढी फळे

अभ्यास

पुढे दिलेल्या विशेषणांची गुणविशेषण, संख्या विशेषणे, सार्वनामिक विशेषण अशा तीन गटात वर्गीकरण करा.

खरा, माझा, काही,श्रेष्ठ, काळे, तो, कर्कश्श, पहिली, त्यांचे, आठ, खूप, असली.

     निर्मिती : सौ. कल्पना चव्हाण, नाशिक     

Previous Post Next Post