जोडशब्द
कधी शब्दांची पुनरावृत्ती होऊन जोडशब्द तयार होतात...
उदा. हळूहळू, तुरुतुरु, गडगडाट, टकटक, लालेलाल इत्यादी.
कधी पहिल्या शब्दाच्या अर्थाचा शब्द जोडून येतो.
उदा. धरपकड, पाऊसपाणी, आसपास, ओढाताण इत्यादी.
कधी दुसऱ्या शब्दातील फक्त अक्षर बदलते.
उदा. अर्धामुर्धा, थाटमाट, का गोडधोड इत्यादी.
अक्कलहुशारी
अवतीभोवती
अक्राळविक्राळ
अकांडतांडव
आगतस्वागत
आरडाओरडा
आडवातिडवा
इडापिडा
अघळपघळ
काळवेळ
अदलाबदल
काळासावळा
अधूनमधून
उघडाबोडका
किडूकमिडूक
केरकचरा
कोडकौतुक
खबरबात
खाडाखोड
खाचखळगे
खाणाखुणा
खेडोपाडी
ख्यालीखुशाली
चोळामोळा
जमीनजुमला
जवळपास
जाडजूड
जाडाभरडा
जीवजंतू
जुनापुराणा
जेवणखाण
झाडलोट
झाडेझुडपे
टक्केटोणपे
टंगळमंगळ
उपासतापास
खेळखंडोबा
टिवल्याबावल्या
उधारउसनवार
उरलासुरला
गणगोत
गल्लीबोळ
ठावठिकाणा
डामडौल
एकटादुकटा
गुरेढोरे
ताळमेळ
ऐसपैस
गोडीगुलाबी
तिखटमीठ
ओबडधोबड
गोरगरीब
त्रेधातिरपीट
अंगतपंगत
गोरामोरा
अंदाधुंदी
कडेकपारी
गोरागोमटा
गोळाबेरीज
कडेकोट
चट्टामट्टा
दिवसाढवळ्या
दीनदुबळ्या
देवधर्म
धडधाकट
धक्काबुक्की
धष्टपुष्ट
धन दौलत
धनधान्य
धूमधाम
ध्यानीमनी
नफातोटा
नोकरचाकर
पाटपाणी
पालापाचोळा
पाळेमुळे
पूजाअर्चा
पैसाअडका
थट्टामस्करी
पोरेबाळे
थातुरमातुर
दगाफटका
दयामाया
कपडालत्ता
चढउतार
दंगामस्ती
काटकसर
चारापाणी
दागदागिने
फौजफाटा
फंदफितुरी
बरेवाईट
बागबगीचा
कानाकोपरा
चिटपाखरू
दाणापाणी
बाडबिस्तरा
काबाडकष्ट
काम धंदा
चूकभूल
दाणागोटा
रोखठोक
लाडीगोडी
लुळापांगळा
वाडवडील
शेजारीपाजारी
सगेसोयरे
सटरफटर
सल्लामसलत
साधाभोळा
सोयरसुतक
हालअपेष्टा
वाकडातिकडा
हेवादावा
चेष्टामस्करी
दिवाबत्ती
भाकरतुकडा
भाजीपाला
भोळाभाबडा
भांडणतंटा
भांडीकुंडी
भीडभाड
मानमरातब
मीठभाकरी
मुलेबाळे
मोलमजुरी
रागरंग
रीतिरिवाज
निर्मिती : सौ. कल्पना चव्हाण, नाशिक