भारत हा शेतीप्रधान देश आहे. तसेच 'शेती' हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेती पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह (Chaudhary Charan Singh) यांचा वाढदिवस (23 डिसेंबर) 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा केला जातो.

          देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी चरण सिंह यांनी भरीव कामगिरी केली आहे. चरण सिंग यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची (नाबार्ड) स्थापना केली. अटल बिहारी वाजापेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत 2020 मध्ये महासत्ता होणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो. मात्र, दुसरीकडे देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होतो. परंतु, याच देशात सध्या शेतकरी सुविधांपासून वंचित आहे. तसेच अलिकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्येतही वाढ होत आहे.

    शेतकऱ्याला सन्मानाने 'बळीराजा' म्हटले जाते. परंतु, प्रत्यक्षात हा राजा अतिशय दीनदुबळा झालेला आपल्याला सध्या पाहायला मिळतो आहे. कर्जबाजारीपणा, वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि आर्थिक विवंचना या आपत्तींचा बळी शेतकरी ठरलेला आहे. प्रत्येक भारतीयाने समाजातील प्रत्येक घटकाने शेतकऱ्यांप्रती किमान कृतज्ञतेची भावना ठेवणे गरजेचे आहे. 
    सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. नैसर्गिक आपत्ती असेल किंवा राजकीय निष्क्रियता यामुळे देशभरात शेतकऱ्यांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. 2 महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या हा पर्याय निवडला. परंतु, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही हे शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवं. यासाठी सरकारनेदेखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. सरकारने शेतीमालाला योग्य हमीभाव देणं, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणं सोप होईल आणि स्वत: चा विकास करण्यास चालना मिळेल. आज राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना शेतकरी दिवसाच्या शुभेच्छा नक्की द्या. जेणे करून त्यांनाही शेतकरी असण्याचा अभिमान वाटेल.
संकलक : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

 ------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

Previous Post Next Post