राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ३० जानेवारी रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेणे व राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यान आयोजित करणेबाबत...
शासन निर्णय
प्रस्तावना :
जगद्-विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले होते की, महात्मा गांधीजींसारखा एक हाडामांसाचा माणूस या पृथ्वीवर होवून गेला यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. गांधीजींच्या समग्र आयुष्याचा विचार करता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्याला अनुभवायला मिळतात. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची शिक्षणविषयक स्वतंत्र भूमिका होती.
शासन परिपत्रक :
“शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे." असे म्हणत नयी तालीमच्या रूपाने देशाला शिक्षणाची देणगी देणाऱ्या महात्मा गांधीजींचा स्मृतिदिनानिमित्त त्यांनी देशाला दिलेल्या 3H (Heart, Hand and Head) मन, मनगट आणि मस्तक यांचा विचार प्रत्येक शिक्षकापर्यंत पोहोचावा, शिक्षकांनी तो विद्यार्थ्यांमध्ये रुजवावा यासाठी हुतात्मा दिन, ३० जानेवारी २०२२ ला विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी खालील विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर यांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा.
उपरोक्त प्रमाणे विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या सादरीकरणाचा २ ते ३ मिनिटांचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाजसंपर्क माध्यमावर (फेसबुक, वीटर, इंस्टाग्राम) #naitalim2022 या HASHTAG (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावे व त्या पोस्टची लिंक खालील लिंकवर देण्यात यावी https://scertmaha.ac.in/competitions
सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी आपल्या स्तरावरून आवश्यक त्यासूचना निर्गमित कराव्यात. सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी.