प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणापुर्वी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणेबाबत | Republic Day Preamble Reading

दिनांक २६ जानेवारी, २०२२ रोजी ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका / Preamble चे सामुहिक वाचन करण्याबाबत...

संदर्भ : शासन परिपत्रक क्रमांक : संकिर्ण २०२०/प्र.क्र.२५/आस्था-५

शासन परिपत्रक

भारताची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून अंमलात आले असून भारतीय संविधानाची पुरेशी माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे.

भारतीय राज्य घटनेतील मुलतत्त्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि त्याचबरोबर घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मुलतत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी असून नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल.

त्यामूळे दिनांक २६ जानेवारी, २०२० पासून दरवर्षी होणाऱ्या ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरनामा) / Preamble याचे सामुहिक वाचन करण्यात यावे.


Previous Post Next Post