'ढ' अक्षराची गंमत...
असे ही काही... कहाणी शब्दांची... गंमत अक्षरांची या सदरात आपल्या मुळाक्षरांपैकी एका मुळाक्षराची गंमत वाचणार आहोत आणि ऐकणार आहोत. "सगळेजण माझी चेष्टा करतात पण त्यांना म्हणावं सर्व अक्षरात शब्दाचा दर्जा मलाच मिळालेला आहे. एवढेच लक्षात ठेवा बरं का!" बघा किती उद्धट अक्षर आहे. अक्षरशः दादागिरी करतो, जसं वर्गातील मुलं अभ्यासात जरी ढ असली तरी बाकीच्या गोष्टीत मात्र खुप हुशार असतात बरं का...!
तसंच हे आपलं ढ अक्षर आज आपण मराठी वर्णमालेतील चौदावे अक्षर आणि ट गटातील चौथ्या व्यंजनाची गंमत पाहणार आहोत, वाचणार आहोत.
मित्रानो ढ हे अक्षर मूर्धन्य प्रकारात मोडले जाते. ढ चा अर्थ ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती, म्हणजेच आपण त्याला मूर्ख म्हणतो. अशा माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे आणि ही गोष्ट पटवून देताना त्या व्यक्तीला अनेक विशेषणाची माळ बहाल केली जाते. जसे अज्ञानी, अडाणी, अर्धवट, ठोंब्या, ढ असे बरेच काही विचारू नका... शाळेतही तुम्ही ढ हा शब्द ऐकला असेलच.
तर आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. सुरुवातीच्या काळापासून ढ हे अक्षर वर्णमालेत जसे आहे. आपल्या वर्णमालेतील इतर अक्षरांना शब्दाचा दर्जा प्राप्त नाही परंतु या ढ अक्षराला मात्र शब्दाचा दर्जा प्राप्त आहे. ढ हे अक्षर पूर्वी शिलालेखांत ढ ज्या प्रकारे लिहला आहे तसाच आपण आज ही लिहतो त्याच्या वळणात काडी मात्र बदल झालेला नाही. जसेच्या तसे जे लिहिले आहे तसेच आपण आज ही लिहीत आहोत. त्या अक्षरावर कोणताही परिणाम झाला नाही त्याचे वळण बदलले नाही.
पण जर आपण बाराखडीतील इतर अक्षरांचा अभ्यास केला तर प्रत्येक अक्षराचे वळण हे कालानुरूप बदलत गेलेले दिसते. सध्याचे अक्षरे जी आपण लिहितो ती अनेक बदलातून घडलेली आहेत अस आपण म्हणू शकतो. परंतु ढ हे अक्षर आणि शब्दांत मात्र काहीही बदल झालेला नाही व त्याच्या वळणावरही परिणाम झालेला नाही, अगदी पूर्वीपासून आहे तसेच आहे. कदाचित म्हणूनच आपण या अक्षराचा अर्थ ज्याला बुद्धी नाही किंवा एखाद्याला एखादी गोष्ट पटवून देणं फार कठीण आहे अशा व्यक्तींसाठी हा शब्द आपण वापरतो. बघा मुळाक्षरिंपैकी फक्त ढ ला अक्षराचा दर्जा प्राप्त आहे आणि म्हणून या अक्षराला वेगवेगळ्या अर्थाचे समानार्थी बरेच शब्द आहेत. कशी आहे अक्षराची गंमत आवडली ना? तर पुढच्या सदरात आपण आणखी एका अक्षराविषयी किंवा शब्दाविषयी जाणून घेणार आहोत.
वाचत राहा... ऐकत रहा...
कहाणी शब्दांची... गंमत अक्षरांची !!
🌿आस
लेख Audio स्वरूपात ऐका
व डाऊनलोड करा
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक