गुरुपौर्णिमा मराठी सूत्रसंचालन | Gurupaurnima Marathi Anchoring


सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम...!!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी श्री. / सौ. ........... मनपूर्वक स्वागत करतो / करते.
गुरुविण कोण दाखवील वाट
जीवनपथ हा, अवघड डोंगर घाट
काही नाती रक्ताची असतात तर काही नाती हि रक्तापेक्षाही घट्ट असतात. असेच एक घट्ट, अतूट व अविस्मरणीय नातं म्हणजेच " गुरु शिष्य " हे नाते होय. आयुष्याला योग्य दिशा व अर्थ लाभतो तो गुरुमुळेच. त्यामुळेच जेथे जेथे संस्कृती रुजली तेथे तेथे गुरु - शिष्य परंपराही वृद्धिंगत होत राहिली. आपल्या संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेचा हा इतिहास हजारो वर्षांपासून रुजलेला आहे.
गुरु हा संतकुळीचा राजा
गुरु हा प्राण विसावा माझा
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात. महर्षी व्यास हे आद्यगुरु मानले जातात. व्यापकदृष्टीने पहिले तर व्यास हि व्यक्ती नव्हे तर शक्ती आहे. हीच शक्ती गुरुपौर्णिमेच्या रात्री कृपेचा अभिषेक करते अशी धारणा आहे. प्रत्येक गुरुच्या अंगी व्यासांचा अंश वास्तव्य करत असतो म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे पूजन व वंदन केले जाते.
अध्यक्षीय निवड :
ज्यांची उपस्थिती वाढविते
गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची शान
स्विकारुनी आमुची विनंती
आपण भुषवावे अध्यक्षस्थान
                                                        - गिरीष दारुंटे
विद्यार्थी मित्रांनो योजीलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जात असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सारथ्य म्हणजेच अध्यक्षस्थान आपणा सर्वांना सुपरिचित असलेले / असलेल्या श्री. / सौ. ........... करते. यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.
(सहकारी शिक्षक / शिक्षिकेने विनंतीस अनुमोदन द्यावे.)
● दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन :
आपल्या संस्कृतीत दिव्याची पूजा म्हणजे प्रकाशाची पूजा होय. तमसो मा ज्योतिर्गमय । हीच आपल्या संस्कृतीची आरती.... दिव्याची ज्योत लहान असते, पण ती ज्योत भोवतालच्या अंधाराला तोंड देते, न घाबरता धीटपणे सामोरे जाते व अंधारावर विजय मिळवून भोवतालचा परिसर प्रकाशमान करते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करतो / करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करावे व अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अज्ञा दूर सारावे.
सुमंगल अशा या वातावरणात
समईच्या उजळल्या वाती
मान्यवरांनी शुभहस्ते
प्रज्वलीत कराव्या ज्ञानज्योती
                                                        - गिरीष दारुंटे
(प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करतांना खालील कोट्स वापरू शकतात...)
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः॥
गुरूंचे अनन्यसाधारण स्थान वरील श्लोकातून ओतप्रोत व्यक्त होत असते. गुरुवंदना परिपूर्ण होते ती या श्लोकातुनच. या श्लोकात.. गुरु हे प्रत्यक्ष ब्रम्ह परमेश्वर असल्याने मी त्यांना नमस्कार करतो असे भाष व्यक्त होतात.
संत ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णिलेला गुरूंचा महिमा देखील बोलका आहे...
सद्गुरूसारखा असता पाठीराखा
इतरांचा लेखा कोण करी.
संत एकनाथांना तर गुरूंचे मोठेपण इतके जाणवले कि ते म्हणतात...
"जगत् संपूर्ण गुरु दिसे" तेव्हा गुरूंचे मोठेपण व महात्म्य हे असे आहे.
 मान्यवर परिचय व स्वागत :
(व्यासपिठावरील मान्यवरांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा.)
अध्यक्ष : श्री / सौ. ...........................................
प्रमुख पाहुणे : श्री./सौ. .................................
अतिथींच्या आगमनाने झाले 
वातावरण प्रसन्न उल्हासित 
करुनी उपकृत आम्हा
स्विकारावे आमुचे स्वागत
                                                - गिरीष दारुंटे
(पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करून ठेवावे.)
 प्रास्ताविक :
सुख दुःखाच्या छायेतून कळते 
जसे सार अवघ्या जीवनाचे
आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते
तसे हे महत्व प्रास्ताविकाचे
                                                        - गिरीष दारुंटे
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आपल्या शाळेचे श्री. / सौ. .................. करतील.
व्यासपिठावरील सन्माननीय अध्यक्ष मान्यवर व विद्यार्थीमित्रांनो...
गुरु हे आपल्याला ज्ञान देतात आपल्या जीवनाला योग्य दिशा व ध्येय निश्चित करून देण्यासाठी सातत्याने झटत असतात. अशा गुरूंप्रती कृतज्ञता आदर, श्रद्धा व भक्ती व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. हजारो वर्षांच्या इतिहासात कित्येक शिष्यांनी आपल्या गुरूंप्रती भक्ती श्रद्धा व्यक्त करून त्यांच्या गुणांनी ते अजरामर झाले आहेत.
यातीलच काही गुरु - शिष्य परंपरा खालीलप्रमाणे...
धौम्य ऋषी - अरुणी
विश्वामित्र - राम लक्ष्मण
द्रोणाचार्य - अर्जुन एकलव्य
परशुराम - कर्ण
गुरुशिष्यांच्या अशाच अनेक उदाहरणांनी आपल्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास उजळून गेलेला आहे. अनेक शिष्यांनी गुरुभक्तीचे आदर्श घालून दिलेले आहेत व गुरुभक्तीचे महत्व पटवून दिलेले आहे. आपणही हेच व्रत अविरत आचरणात ठेवणे व जोपासणे तितकेच महत्वाचे आहे. खरेतर आपण कोणाचेतरी शिष्य आहोत या भावनेतच एक कृतज्ञता असते.
(गुरु-शिष्य परंपरेवर आधारित कथांचाही प्रास्ताविकात समावेश करू शकतात.)
● विद्यार्थी व शिक्षक भाषणे :
(प्रास्ताविक वाचनानंतर क्रमवार विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे घ्यावीत.)
● अध्यक्षीय / मान्यवर भाषणे :
तेज तुमचे आहे,
सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या शब्दातच आहे,
जीवनाचे संपूर्ण शास्त्र
ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून, 
कळस गाठू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे...
अध्यक्षीय मार्गदर्शनाचा
विद्यार्थ्यांच्या यशप्राप्तीसाठी यथायोग्य मार्गदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. / सौ. ......... यांनी करून त्यांच्या ज्ञानकुंभातील काही मार्गदर्शनपर मौलिक विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील. मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शनपर विचार विद्यार्थ्यांसमोर मांडावेत... धन्यवाद !!
● आभार प्रदर्शन :
माझे सहकारी शिक्षक / शिक्षिका श्री. / सौ. ........... आभार प्रदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो /करते.  व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ देऊन व विद्यार्थ्यांप्रती अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी .......... विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्श सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो / करते.
ज्ञानकुंभ रिता करुनी
अनमोल प्रेरक ज्ञान दिले
बोधामृत पाजूनी ज्ञानाचे
आम्हा उपकृत केले
तुम्ही पाठीराखे आमुचे
सदा तुमचाच आधार
मार्गदर्शन असू द्यावे नित्य
स्विकारुनी हे आभार
                                            - गिरीष दारुंटे
आपण केलेल्या मार्गदर्शनाचा प्रेरक विचारांचा व अनुभवाचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व त्यांची सर्वांगीण साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे. समाज व राष्ट्रहितावह अशीच प्रगती तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.
थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत
त्यांचेही मनपूर्वक आभार
● समारोप :
आतिथींच्या येण्याने
कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या अनमोल मार्गदर्शनाने
आम्हाला नवी दिशा मिळाली
शेवटी आता समारोपाची वेळ आली
आजच्या कार्यक्रमाची सांगता पसायदान / वंदे मातरम / राष्ट्रगीताने होईल.
सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या कार्यक्रमाची येथे सांगता होतेय असे मी जाहीर करतो / करते.
!! जय हिंद - जय महाराष्ट्र !!

(कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता.)

शब्दांकन : गिरीष दारुंटे, मनमाड

  Copyright Disclaimer  

वरील माहिती  स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

--------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📲 गुरुपौर्णिमा सूत्रसंचालन

📲 गुरुपौर्णिमा माहिती मराठी

📲 गुरु पूजनाचा दिवस

📲 जीवनात गुरुचे महत्व

📲 गुरुशिष्य कथा संग्रह 1

📲 गुरुशिष्य कथा संग्रह 2

📲 गुरुशिष्य कथा संग्रह 3

📲 गुरुपौर्णिमा माहिती हिंदी

📲 गुरुपूर्णिमा का महत्व

📲 गुरुपूर्णिमा की कहाणी

📲 गुरुपौर्णिमा इंग्रजी माहिती

--------------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

--------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

Previous Post Next Post