सामाजिक न्याय दिन | राजर्षी शाहू महाराज जयंती | 26 June Social Justice Day

सामाजिक न्याय दिन

महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय दिन हा २६ जून रोजी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो.

DOWNLOAD PDF HERE

सामाजिक न्याय म्हणजे शोषणविरहीत, समताधिष्ठित, न्याय्य समाजाची निर्मिती षणविरहीत, होय. एक समाजवादी राष्ट्र या भूमिकेतून सामाजिक न्याय ही संकल्पना समताधिष्ठित समाजनिर्मितीकडे जाणारी आहे. सामाजिक न्याय या विस्तृत संकल्पनेमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. त्यामध्ये दलितांचे प्रश्न. उदा. प्रतिनिधित्व, आरक्षण, ॲट्रॉसिटी, विषम वागणूक इत्यादी. आदिवासींचे प्रश्न. उदा. जंगल आणि जमिनीवरचा हक्क, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याविषयीच्या समस्या इत्यादी. स्त्रियांचे प्रश्न उदा. प्रतिनिधित्व, अन्यायी वागणूक, कौटुंबिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, बलात्कार, कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, ऑनर किलींग इ. तसेच अपंगांच्या समस्या, वृद्धांच्या समस्या, मानवी देह व्यापार, बालकामगार, झोपडपट्टय़ांचे प्रश्न, शिक्षणाच्या समस्या विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षण तसेच आरोग्य, कुपोषणाची समस्या या सर्व बाबींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. सामाजिक न्याय हे कल्याणकारी राज्याचे एक वैशिष्टय आहे.

सामाजिक न्याय या विस्तृत संकल्पनेमध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो. त्यामध्ये दलितांचे प्रश्न. उदा. प्रतिनिधित्व, आरक्षण, ॲट्रॉसिटी, विषम वागणूक इत्यादी. आदिवासींचे प्रश्न. उदा. जंगल आणि जमिनीवरचा हक्क, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याविषयीच्या समस्या इत्यादी. स्त्रियांचे प्रश्न उदा. प्रतिनिधित्व, अन्यायी वागणूक, कौटुंबिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, बलात्कार, कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, ऑनर किलींग इ. तसेच अपंगांच्या समस्या, वृद्धांच्या समस्या, मानवी देह व्यापार, बालकामगार, झोपडपट्टय़ांचे प्रश्न, शिक्षणाच्या समस्या विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षण तसेच आरोग्य, कुपोषणाची समस्या या सर्व बाबींचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

या समस्यांची माहिती तर करून घ्यावीच लागणार आहे पण त्यासोबतच शासकीय पातळीवर या संदर्भामध्ये काय उपाय योजना केल्या जात आहेत हे पाहणं गरजेचं आहे. उदा. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी असणारे 'सर्व शिक्षा अभियान' किंवा ग्रामीण भागातील आरोग्यासाठी असणारे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रम तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणारा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कार्यक्रम असेल, अशा सर्व योजनांची सविस्तर माहिती असणे, त्यांच्यातील होणारे बदल अभ्यासणे, त्या कार्यक्रमांमधील त्रुटी, अडचणी जाणून घेणे. त्यादूर व्हाव्यात यासाठी बदल, पर्याय यांची माहिती असावी लागणार आहे. या सर्व कार्यक्रमांचं टीकात्मक परीक्षण करावं लागेल.

सामाजिक न्याय हे कल्याणकारी राज्याचे एक वैशिष्टय आहे. उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर सामाजिक न्याय या संकल्पनेवर काय परिणाम झाला, शासन या संकल्पनेकडे कसं पाहाते आहे, सामाजिक न्यायाची भारतातील पुढील वाटचाल कशी असेल, या बाबींचा अभ्यास करावा लागेल. आता आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी थोडी चर्चा करू. आंतरराष्ट्रीय संबंधाविषयी चर्चा करताना तीन गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. यामध्ये प्रथमत: भारत आणि शेजारील राष्ट्रे यांच्यातील संबंध, यानंतर भारत आणि विविध जागतिक महासत्ता यांच्यातील संबंध उदा. अमेरिका, चीन, युरोप, जपान, रशिया इत्यादी तसेच महत्त्वाच्या जागतिक घडामोडी उदा. इस्रइल-पॅलेस्टाइन, अरब स्प्रिंग, जागतिक महामंदी, महत्त्वाच्या जागतिक संघटना, संयुक्त राष्ट्र संघटना, इफकउर इत्यादी.

आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करताना भारताचे परकीय धोरण, त्याची जडणघडण, इतिहास, उद्दिष्टये, धोरण ठरवताना विचारात घेतले जाणारे घटक, भारताच्या परकीय धोरणासमोरील आव्हानं, नेतृत्वाची भूमिका, निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणारे विविध घटक इत्यादी बाबी अभ्यासाव्या लागतील. भारताच्या परकीय धोरणामध्ये होत गेलेले बदल, अलिप्त राष्ट्र चळवळ, १९९०च्या सोव्हिएत रशियाच्या पाडावानंतर भारताच्या परकीय धोरणामध्ये झालेले बदल, लुक इस्ट पॉलिसी, आदर्शवादाकडून वास्तववादाकडे झालेले मार्गक्रमण, रशियाकडून अमेरिकेकडे वाढलेला भारताचा ओढा, त्याची कारणे, उदारीकरणाचे परकीय धोरणावर झालेले परिणाम, जागतिकीकरण आणि तिस-या जगातील राष्ट्रांचे प्रश्न, भारताचे विकसनशील राष्ट्रांचे नेतृत्व, भारताचे बहुध्रुवीकरणासाठी असणारे प्रयत्न, भारत आणि संयुक्त राष्ट्रसंघ, संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरुपी सदस्यत्वाची भारताची मागणी, कारणे आणि प्रयत्न, ऊर्जा सुरक्षा, ऊर्जा सुरक्षेसाठी केली जाणारी 'एनर्जी डिप्लोमसी' इत्यादी विविध पैलू लक्षात घ्यावे लागतील.

सामाजिक न्याय दोन प्रकारचे असतात : पहिला, औपचारिक न्याय, जो न्यायसंस्था कायद्यांमधील तरतुदींनुसार दोषी व्यक्तींना शिक्षा देऊन कार्यवाहीत येतो. अशा सामाजिक न्यायाचे स्वरूप कायदेशीर आणि गुन्हेगारीशास्त्राशी निगडित असते. अशा न्यायाचे स्वरूप 'देवाने दिलेली शिक्षा' असेही मानले जाते. 'देवाने दिलेले शासन' हा एक सिद्धांत मानसशास्त्रीय साहित्यात महत्त्वाचा मानला जातो.

दुसरा, अनौपचारिक न्याय, जो नैतिकता आणि राजकीय परिस्थितीशी संबंधित असतो. तो विधायक आणि माणुसकीचा निकष लावून समाजात उपलब्ध असलेल्या चांगल्या-वाईटाचे वाटप करण्यावरून दिला जातो. योग्य निकष लावून हक्कांचे वितरण केले जाते. यामध्ये दोषी लोकांना शिक्षा दिली जाते, ती केवळ इतरांनी पुन्हा वाईट वागू नये म्हणून. ह्या शिक्षेमुळे पीडितांना, दुर्बलांना सामाजिक न्याय पूर्णपणे मिळत नाही; परंतु अशा होणाऱ्या शिक्षा तात्पुरत्या दहशत निर्माण करतात.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

--------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

Previous Post Next Post