राजर्षी शाहू महाराजांचे कार्य
बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून, स्वाभिमानाचे जीवन देणारे, आरक्षणाचे जनक, थोर समाजसुधारक, आरक्षणाचे जनक, रयतेचे राजे, समतावादी लोकराजे, राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते, बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे, द्रष्टे समाजसुधारक, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते, जाणता राजा म्हणजेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज होय !
शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे मुळ नाव यशवंत होते. २ एप्रिल १८९४ मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानची अधिकारसुत्रे आपल्या हाती घेतली छत्रपती शाहूंचे प्रजेविषयी कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करुन ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरीयाने त्यांना 'महाराज' ही पदवी बहाल केली, त्यांनी अनेक वसतिगृहे सुरु केली. बहुजन समाजासाठी आणि अस्पृश्यांना मानाचे स्थान मिळण्यासाठी त्यांनी भरभरून कार्य केले . सहा फुट चार इंच उंचीचे बलदंड शरीर, कणखर धिप्पाड रुंद छाती, टपोरे डोळे, पहाडी आवाज,अफाट ताकद असलेल्या या राज्याला उणेपुरे ४८ वर्षाचे आयुष्य दिले. ६ मे १९२२ रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
संस्थात्मक योगदान : ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार् या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.
1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर). नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.
1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.
15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.
1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.
1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.
1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.
1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.
लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल. पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल. जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.
1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.
1917 - विधवा विवाहाचा कायदा.
1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.
1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.
वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.
1920- माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन. 1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.
1899 - वेदोक्त प्रकरण- सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत. यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.
1906- शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.
1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.
1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.
1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.
1912 कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.
1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.
1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.
1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.
1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.
1920- घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.
1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते. ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
--------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻