पतेती..... पतेती म्हणजे पारशी लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात.... या दिवशी गेलेल्या वर्षात काय केले, याचा आढावा घ्यायचा असतो आणि नवीन वर्षासाठी शुभसंकल्प करावा अशी अपेक्षा असते. पारशी वर्षारंभ दिनाला 'नवराज' म्हणतात. हे ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबर महिन्याच्या आरंभी येतो. त्यापूर्वी वर्ष अखेरचे सहा दिवस 'पतेती' सण असतो. पारशी नूतन वर्षाचा प्रारंभ 'फरवर्दीन' मासाने होतो. तत्पूर्वी आज पारशी वर्षाचा अखेरचा दिवस 'पतेती' म्हणून साजरा केला जातो.
वर्षभरात पतेती, नवरोज व चैत्रात जमशेदजी नवरोज हे तीन सण साजरे केले जातात. चैत्रातला जमशेदजी नवरोज हा 'चैत्रगौरी' प्रमाणे साजरा केला जातो. पारशी वर्षाचे शेवटचे दहा दिवस हे पितृपक्षाप्रमाणे पितरशांतीकरिता पाळले जातात.
या दहा दिवसांत प्रत्येक पारशी कुटुंबाकडून पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून फुले किंवा फुलदाणी वाहिली जाते. नवरोजला नव्या वर्षाच्या प्रारंभानिमित्त मंगलमय वातावरणात सकाळी अग्यारीत अग्नीची पूजा केली जाते. तसेच पंचमहाभूतांची देखील पूजा केली जाते.
पारशी समाजाचे दैवत म्हणजे 'अग्निदेव' व धर्मसंस्थापक झरतुष्ट्र हे होत. 'अवेस्ता' या पारशी धर्मग्रंथातील शांतिपाठांचे मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने करतात. यादिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करून नवे कपडे परिधान करतात. शेवया, शिरा, मिष्ठान्न व विशेषत: गोड दही आदी पदार्थ बनविले जातात. तसेच जेवणात पुलाव, डाळ, पात्राणी आदी विविध पंचपक्वान्नांचा घाट घातला जातो. पाहुणे, शेजारी व मित्रांना मिठाई व शुभेच्छा दिल्या जातात.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 गिरीश दारुंटे सूत्रसंचालन PDF
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉