प्रदूषणमुक्त दिवाळी शपथ
भारतीय परंपरेतील सर्व सण आणि उत्सव यांच निसर्गाशी अतूट नात आहे. सर्वसामान्य नागरिकांना निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्यासाठी कोठेही पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ व पर्यावरणाचा समतोल राखू.
आम्ही सर्वजण असाही संकल्प करतो की, दैनंदिन जीवनात ज्या प्लास्टिकमुळे प्रदूषण होते. त्याचा वापर करणे आम्ही टाळू.
आम्ही असाही संकल्प करतो की, समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरीता आमच्या वाढदिवसाला किमान एक झाड लावू व त्याचे नित्यनियमाने संगोपन करू.
दिवाळी म्हणजे लक्ष लक्ष दिव्यांचा तेजोमय प्रकाश, या दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचे प्रदूषण होणार नाही याकरीता फटाके न वाजवता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करीत आहोत.
आम्ही भारताचे भविष्यातील समर्थ नागरिक म्हणून सर्व विद्यार्थी शपथ घेतो की, वर्षभरातील सर्व सण व उत्सव प्रदूषणमुक्त साजरे करण्यासाठी कटिबद्ध राहू.
!! दीपावली शुभचिंतन !!
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक