सुस्वागतम... सुस्वागतम ... सुस्वागतम ... !!
सोहळा हा सेवानिवृत्तीचा
क्षण आनंदाने नटला
खेळ संमिश्र भावनांचा
प्रत्येकाच्या मनी दाटला
- गिरीश दारुंटे
आपण सर्वच जाणतो की जेथे प्रारंभ असतो तेथे अंत देखील ठरलेलाच असतो. मग तो प्रारंभ जीवन प्रवासाचा असो, एखाद्या कार्याचा असो किंवा कौटुंबिक जबाबदारी अथवा कर्तव्य पार पाडण्यासाठी स्वीकारलेल्या सेवेच्या व्रताचा असो... आयुष्यात ती एक संध्याकाळ येतेच की त्या दिवशी आपली इच्छा असो अथवा नसो तरीही घेतलेल्या सेवेच्या व्रतास पूर्णविराम द्यावाच लागतो. अन हाच तो क्षण असतो जेव्हा अखंड सेवेचे सिंहावलोकन नजरेसमोर उभे ठाकते.
निरोप समारंभाचा आजचा दिवस आहे,
मनात आठवणींचा अनमोल ठेवा आहे !
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात...
प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे,
म्हणुन काही क्षणभर, तर काही...
आयुष्यभर लक्षात राहतात.
वरील ओळींप्रमाणेच कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहणारे व आज सेवानिवृत्त होत असलेले असेच एक मार्गदर्शक व्यक्तिमत्व... ज्यांच्या कर्तृत्वाच्या पायावर ह्या ज्ञानमंदीराची इमारत अजून भक्कमपणे उभी राहीली आणि त्यांच्या यशाच्या, सत्कार्याचा सुगंध सदैव या शाळेला प्रफुल्लीत करत राहीला असे आजचे सत्कारमुर्ती व सेवानिवृत्त होत असलेले आदरणीय श्री.. यांच्या सेवापुर्तीच्या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी ....................... स्वागत करतो / करते.
संपूर्ण सूत्रसंचालन PDF डाऊनलोड करा
निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Copyright Disclaimer
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.
ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
इतरही उपयुक्त माहिती
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉