सुस्वागतम... सुस्वागतम ... सुस्वागतम ... !!
सज्ज सारे लोक आहेत,
क्षण आले अमृताचे
उजळलेला मंच आहे,
तेज जैसे पौर्णिमेचे
त्या मनालाही कळाले,
भाव माझ्या या मनाचे
गोड मानून घ्या श्रोतेहो,
शब्द माझे स्वागताचे !!
आज आपण या ठिकाणी आपले सर्वांचे सहकारी सन्माननीय ......................... यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमले आहोत. यानिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, सहकारी, पाहुण्यांचे व आप्तेष्ट मित्रपरिवाराचे मी मनपूर्वक स्वागत करतो/करते.
इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे सेवानिवृत्तीचा दिवस. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर नकळतच अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु झालेली असते. पण ज्या मित्रांच्या व सहकाऱ्यांच्या साथीने आपण आयुष्यातील जे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते.
विद्यार्थ्यांनी तुम्हाला गुरूस्थानी मानून गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिलेल्या असतात, अशा अनेक आठवणी मनात फिरुनी येत असतात. सेवानिवृत्तीच्या दिवशी मनावर दगड ठेवून आपण आनंद तर साजरा करत असतोच, पण या दिवशी दुःखही तेवढेच होत असते. अशावेळी आपल्या जवळची व्यक्ती अथव सहकारी सेवानिवृत्त होणार असेल तर आपल्या मनातील त्यांच्याविषयीच्या भावना मांडण्याची ही योग्य वेळ असते...
संपूर्ण सूत्रसंचालन PDF डाऊनलोड करा
निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Copyright Disclaimer
वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.
ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
इतरही उपयुक्त माहिती
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉