सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :
१. सदर सेतू अभ्यास मराठी व उर्दू व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.
२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.
३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या २० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात याची.
४. सदर कृतिपत्रिका (worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.
५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. काही विषयातील अधिक माहिती घेऊ या मधील प्रश्न विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.
६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात. पूर्व व उत्तर चाचणी गुणांचा तुलनात्मक तक्ता तयार करून शिक्षकांनी आपल्या स्तरावर ठेवावा.
७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करावी.
उपरोक्त प्रमाणे सदर सेतू अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेतील सर्वाना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू अभ्यासाची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शाळा भेटींच्या आधारे जिल्हानिहाय सेतू अभ्यास २०२३- २४ अहवाल शिक्षणाधिकारी व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने अंमलबजावणी झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास ईमेलद्वारे विनाविलंब सादर करावा.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
दिनविशेष, जयंती, पुण्यतिथी भाषणे व सूत्रसंचालन क्लिक करा.
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉