ईद-ए-मिलाद सणाची माहिती | ईद-ए-मिलाद मराठी माहिती | Eid-e-Milad-Un-Nabi

  DOWNLOAD PDF HERE  

ईद-ए-मिलाद म्हणजे ' अल्लाह चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस. जगभर ' ईद-ए-मिलादुन्नबी ' हा सण इस्लामी वर्ष हिजरी रब्बी अवल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो. ईद-ए-मिलादच्या दिवशी खुलताबादचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. खुलताबाद येथील हजरत बावीस ख्वाजा सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात १४०० वर्षांपूर्वीचा हजरत मोहम्मद पैगंबर यांचा पवित्र पोशाख 'पैराहन-ए-मुबारक' गेल्या ७०० वर्षांपासून जतन करून ठेवण्यात आलेला आहे. येथे दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लीम भाविक मोठया श्रद्धेने लाखोंच्या संख्येने गर्दी करतात.

येथील समोरच असलेल्या हजरत ख्वाजा बु-हानोद्दिन यांच्या दर्ग्यात ' मुँ-ए- मुबारक' (मिशीचा केस ) व पैराहन-ए-मुबारक (पवित्र पोशाख )) ईद-ए- मिलादच्या दिवशी दर्शनासाठी खुला केला जातो. या पवित्र पोशाखाच्या दर्शनाला जगभरातील लाखो मुस्लीम भाविक मोठया भक्तिभावाने खुलताबाद येथे येत असतात. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त ' मुबारक' या पर्वकाळात हा पोशाख व मिशीचा केस दर्शनासाठी काचेच्या पेटीत खुला ठेवण्यात येतो. मुस्लीम भाविक मोठया श्रद्धेने लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. यावेळी गोडभात प्रसाद म्हणून वाटला जातो.

हजरत महंमद पैगंबर यांच्या पोशाखामुळे खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला काश्मीरमध्ये असलेल्या हजरतबल दर्ग्याच्या बरोबरीचे महत्त्व आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्म ई.स. ५७१ मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला. जन्माअगोदरच त्यांचे पितृछत्र हरपून गेले होते.

वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रीना पण देवाज्ञा झाली. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्याच्या चुलत्याने संगोपन केले. लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेला हा बालक धर्माचा संस्थापक बनला. आपल्या जीवनकाळात हजरत मोहमद यांनी समस्त मानवजातीला उदारता, समता, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जातीधर्मापूरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती.

मुस्लिम धर्माचे दोन महत्त्वपूर्ण सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह. ईद उल फितर ईद ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.

ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरियत कायद्यातील मापदंड आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईद हा आनंदाचा सण असल्याने ईदच्या दिवसांमध्ये मुस्लिम बांधवांच्या चेहर् यावर आनंद खुललेला दिसतो. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन घेऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात.

ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिलावर्गात मोठा उत्साह दिसून येतो. पहिल्या दुसर् या रोजापासून घरात त्या शेवया तयार करायला सुरवात करतात. मात्र, हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच दिसते, शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागल्या आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्तजनांना आपल्याकडे शिरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते.

ईदच्या शुभ पर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहत असेल तर ती ईद मुस्लिम धर्मासाठी आनंदाची नाही, असे मानले जाते. मुस्लिम धर्मातील तळागाळातील व्यक्तीला ईदच्या पावन पर्वाचा आनंद घेता यावा, यासाठी जकात व फितराची तरतूद मुस्लिम शरियत कायदामध्ये करण्यात आली आहे. जकात हे ईदच्या आधी दिले जाते. कारण त्यांनी ही या वर्षांतून एकदा येणार् या महान पर्व ईदचा आनंद तुटता यावा. मुस्लीम समाज ईद साजरी करतात. त्यातला रमजान ईद व बकरी ईद साजरी करून आनंद मिळवतात. रमजान ईद हा क्षण जरा निराळा आहे. दिवसभर कडकडीत उपवास करून पाण्याचा एक घोटही न घेता उपवास म्हणजे रोजा संपल्यानंतर रात्री फराळ करायचा, जेवण घ्यायचे. असे काही मुस्लीम बांधवांनी रमजान ईदच्यासणाची थोडी बहुत माहिती दिली. रोजे संपल्यावर येणारा शेवटचा दिवस रमजान ईदसणाचा असतो. पाणी न पिता खडतर उपवास का करायचा तर अल्लाहचे स्मरण करून जपात विधवा पवित्र कुराण वाचण्यात अल्लाहच्या स्मरणातच संपुर्ण दिवस घालवणे.

गरिबांना दान करणे, यतिमांना आधार देणे, शेजारी पाजारी उपाशी असेल तर त्यांना जेवणाचे ताट देणे, अशी काही इस्लामची शिकवण आहे असे म्हणतात. म्हणुन माणसा-माणसाला जोडणे, एकमेकांनी अत्यंत प्रेमाने राहणे हाच इस्लामचा धर्म आहे. हीच अमन आणि शांती असे मुस्लीम धर्म सांगतो.

खरं म्हणजे सर्व धर्मांतला समाज जोगरीब आहे तो अत्यंत कष्टात दिवस घालवत आहे. नरकयातनाच सध्या सर्व धर्मांतील समाजातील गरीब वर्ग भोगत आहे. पहाटेच्यावेळी दिवस उजाडण्याच्या आधी मशीदीमधून मौलवीची स्पीकरमधून प्रार्थना कानी पडते आणि त्याच परमेश्वर व अल्लाहची आठवण होते.

आजही आमचे काही जवळचे मुस्लिम बांधव मत्र आहेत. रमजान, बकरी ईदला गोड तिखट जेवण आमच्या घरी आणुन देतात. आम्हीपण दिवाळीला गोड तिखट पदार्थांची ताटे मुस्लीम बांधव मित्रांच्या घरी जाऊन देतो. या देण्याघेण्याच्या पाठीमागे एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याचे साधन असते. मत्सर, द्वेष, अहंकार, श्रेष्ठता, कनिष्ठता, प्रेमामध्ये मुहब्बतमध्ये नसते. प्रेमाचे - धागे माणसामाणसाला जोडतात. जो प्रेम तोडतो तो सैतान असतो. आजदेखील सैतान अनेक देशात हाहाकार माजवून राष्ट्रीय संपत्तीची होळी करून माणसांची हत्या करून रक्ताचे पाट वहावत आहेत. या सैतानाला अल्लाह ठेचत राहो ही आजच्या सणादिवशी मनापासून प्रार्थना.

•⊰⊱••⊰ MSP ⊱••⊰⊱•

इतरही उपयुक्त माहिती
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

━━━━━━━━

📲 दिनविशेष भाषणे, सूत्रसंचालन व शैक्षणिक माहितीसाठी WhatsApp Channel Follow करा👇🏻

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

━━━━━━━━

Previous Post Next Post