सुस्वागतम... सुस्वागतम... सुस्वागतम... !!

अतिशय उल्हासपूर्ण वातावरणात सुरु होत असणाऱ्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित शिक्षण विभागातील सर्व सन्माननीय अधिकारीवर्ग तसेच निमंत्रित अतिथींचे मी श्री. / सौ. ......... शाळेच्यावतीने आदरपूर्वक स्वागत करतो / करते.

विद्यार्थीमित्रांनो असे म्हणतात कि...

रडता रडता हसविते

अशीही खेळाची किमया

अन खेळाविण सुनी भासे

अवघी शाळेची दुनिया

                                             - गिरीश दारुंटे

साहजिकच आहे...!! पण खऱ्या अर्थाने आजचा दिवस तुमचाच आहे, कारण प्रत्येक शैक्षणिक वर्षात ज्या दिवसाची तुम्ही चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असता तोच हा दिवस म्हणजेच आपल्या शाळेचा “ वार्षिक शालेय क्रीडा महोत्सव " होय.

अतिशय उल्हासपूर्ण वातावरणात सुरु होत असणाऱ्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित शिक्षण विभागातील सर्व सन्माननीय अधिकारीवर्ग तसेच निमंत्रित अतिथींचे मी श्री. / सौ. .......... शाळेच्यावतीने आदरपूर्वक स्वागत करतो / करते.

विद्यार्थीमित्रांनो असे म्हणतात कि...

रडता रडता हसविते

अशीही खेळाची किमया

अन खेळाविण सुनी भासे

अवघी शाळेची दुनिया

                                           - गिरीश दारुंटे

साहजिकच आहे...!! पण खऱ्या अर्थाने आजचा दिवस तुमचाच आहे, कारण प्रत्येक शैक्षणिक वर्षात ज्या दिवसाची तुम्ही चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असता तोच हा दिवस म्हणजेच आपल्या शाळेचा “ वार्षिक शालेय क्रीडा महोत्सव " होय.

खेळ खेळता खेळता मैदानी

लक्ष आता विजयाकडे लागले

मैदानी खेळांच्या विजयानेच 

मनी ध्येय आयुष्याचे जागले

                                  - गिरीश दारुंटे

विद्यार्थी मित्रांनो खेळामुळेच तुमच्यातील स्वाभिमान, सामाजिक कौशल्ये, सांघिकवृत्ती व आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत मिळते. वेळेचे व्यवस्थापन व शिस्त यांची सांगड कशी घालावी हे देखील तुम्हाला खेळातूनच शिकण्यास मिळते. खेळातूनच आजवर कित्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आपले जीवनाचे ध्येय सापडले आहे.

वास्तविक पाहता प्रत्येक आंतरराष्ट्रीय खेळाडूच्या करिअरची सुरुवात शालेय जीवनातच झालेली असते यात शंकाच नाही. खेळ हे विद्यार्थ्यांमधील ताणताणाव व नैराश्य कमी करण्यास मदत करतात हे मानसशास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध देखील झालेले आहे.

तुमच्यातील खेळाडूवृत्तीचे, तुमच्यातील शारीरिक कसब व तुमच्या आवडत्या खेळाबद्दल तुमच्यात असणाऱ्या शारीरिक क्षमतांचे मोजमाप करण्यासाठी शालेय जीवनातील शालेय क्रीडा महोत्सव हे तुम्हा सर्वांनाच आवडणारे तुम्हा सर्वांचे हक्काचे व्यासपीठ आहे. खेळांमधूनच तुमच्यातील खिळाडूवृत्ती व तुमच्यातील कसब तुम्हाला तुमचीच इतरांना नव्याने ओळख देते.

अशा नाना खेळांपरी छटा अंगीभूत असणारा व उत्साहाने ओतप्रोत वाहणारा उर्जारूपी सोहळा म्हणजेच शालेय क्रीडा महोत्सव... आजच्या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सन्माननीय मान्यवर व सर्व लाडक्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे मी पुनश्च एकदा  स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते.

क्रीडा स्पर्धा सूत्रसंचालन

● अध्यक्षीय निवड :

विद्यार्थीमित्रांनो ज्याप्रमाणे खेळात प्रत्येक संघाला एक संघनायक अर्थातच तुमच्या भाषेतच सांगायचे झाले तर कॅप्टन आवश्यक असतो, त्याचप्रमाणे कार्यक्रम कोणताही असो त्या कार्यक्रमाला अध्यक्षांची आवश्यकता असतेच, त्याशिवाय कार्यक्रमाला शोभाच येत नाही. त्यामुळे आपल्या आजच्या क्रीडा महोत्सवाच्या प्रसंगी आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले तसेच सर्वांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे, उपक्रमशीलतेमुळे व अंगी असलेल्या कुशल नेतृत्व गुणांमुळे आपणा सर्वांना सुपरिचित असलेले श्री. ....... यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो / करते.

(अध्यक्षपदाच्या विनंतीस अनुमोदन द्यावे)

तसेच आपल्या स्नेहपूर्वक विनंतीस मान देऊन क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्मानीय       श्री. ....... यांचेही मी या ठिकाणी स्नेहपूर्वक स्वागत करतो / करते.

● दीपप्रज्वलन / प्रतिमा पूजन :

आजच्या क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व व्यासपिठावरील सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की त्यांनी त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करावे आणि अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देवून अजानास दूर सारावे.

(दीपप्रज्वलन करतेवेळी)

अतिर्थीच्या आगमनाने

आनंदिले हे सेवासदन

अतिथींना असे विनंती...

करूनी दिपप्रज्वलन

प्रसन्न करावे वातावरण

● सरस्वती पूजन : 

(सरस्वती पूजन करतेवेळी)

या देवी सर्वभूतेषु वि‌द्यारूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

भूतलावरील कणाकणात ज्या बुद्धिरूपी शक्तीचे वास्तव्य आहे व जिच्या कृपेने सकल जगत, जानरुपी तेजाने तमास दूर सारून ज्ञानाचे तेज पसरवीत आहे, अशा विद्येच्या रुपात अस्तित्वात असणाऱ्या व सकल मानवजातीच्या जीवनात ज्ञानरुपी प्रकाशाच्या रुपाने चैतन्य व ज्ञानप्रदान करून अविरत वरदहस्त शिरी धरणाऱ्या सरस्वती मातेस मी वंदन करतो / करते.

● मान्यवर स्वागत व परीचय :

(आमंत्रित मान्यवरांचे स्वागत)

संस्कृती आहे आपली आतिथ्याची

प्रथा निराळी त्याहून स्वागताची

सुमधुर शब्दसुमनांनी स्वागत अतिथींचे

हीच असे ओळख आपल्या संस्कृतीची

 ( व्यासपीठावरील मान्यवरांचा त्यांच्या शैक्षणिक / सामाजिक / राजकीय कार्यकर्तृत्वानुसार परिचय करून देण्यात यावा. )

अध्यक्ष : श्री / सौ. __________

प्रमुख पाहुणे : श्री. / सौ.  ___________ 

                   अतिथींच्या आगमनाने झाले

वातावरण प्रसन्न उल्हासित

करुनी उपकृत आम्हा

स्वीकारावे आमुचे स्वागत

(पुस्तक स्वरूपात / झाडाचे रोप देऊन यथोचित स्वरुपात स्वागतनियोजन करावे.)

● स्वागत गीत :

स्वागत गीत

इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा

स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा IIधृII

दाही दिशांनी गुणीजन आले सभामंडपी स्वागत झाले

पूर्वनियोजित अपूर्व घडले , सावरल्या नजरा

स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा II१II

नम्र कलेचे कुणी उपासक , कुणी तपस्वी कुणी साधक

शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा

स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा II२II

इतिहासाचे रंग रूप हे आले या नगरा

स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा II

स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा II

● मान्यवर मार्गदर्शन / मनोगत   :

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. / सौ. ______ यांनी मार्गदर्शन करून त्यांच्या अनुभावाच्या ज्ञानकुंभातील काही मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर समोर  मांडावेत जेणेकरून त्यांचे अनमोल व विचार  विद्यार्थ्यांना प्रेरक , दिशादर्शक व मार्गदर्शक ठरतील.

मी त्यांना विनंती करतो / करते कि त्यांनी आपले विचार मांडावेत... धन्यवाद !!

तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त

तुमच्या हरेक शब्दातच आहे

जीवनाचे संपूर्ण शास्त्र 

ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून

कळस गाठू प्रगतीचा

त्यासाठीच मान आहे

मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा

क्रीडा स्पर्धा सूत्रसंचालन

● आभार प्रदर्शन :

माझे सहकारी श्री. / सौ. _____ आभार प्रदर्शन करतील.

ज्ञानकुंभ रिता करुनी

अनमोल , प्रेरक ज्ञान दिले

बोधामृत पाजूनी ज्ञानाचे

आम्हा उपकृत केले

तुम्ही पाठीराखे आमुचे

सदा तुमचाच आधार

मार्गदर्शन असू द्यावे नित्य

स्विकारुनी हे आभार

                                               - गिरीश दारुंटे

आपण केलेल्या मार्गदर्शनाचा , प्रेरक विचारांचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल व यातूनच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना अविशाराची व झेप घेण्याची प्रेरणा मिळेल तसेच त्यांची  प्रगती साधली जाईल याची आम्हाला खात्री आहे.

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ आजच्या कार्यक्रमासाठी दिल्याबद्दल मी श्री. / सौ. _______   विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो / मानते व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो / करते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले व प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानने देखील याप्रसंगी क्रमप्राप्त ठरते.

थेंबाथेंबाने तलाव भरतो,

हाताहाताने कार्यक्रम फुलतो

जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार

तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचेही आभार

● समारोप :

जेंव्हा वसंतात येतो फुलांना बहार 

तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार 

आपण सर्वांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार

आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली

आपल्या मार्गदशर्नाने

आम्हाला दिशा मिळाली

शेवटी आता समारोपाची वेळ आली

आजच्या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम / राष्ट्रगीताने होईल.

सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची येथे सांगता होतेय असे मी जाहीर करतो / करते.

(सूत्रसंचालनातील वापरलेले काही चारोळ्या स्वरचित असून काही चारोळ्या संकलीत असल्याने ज्ञात / अज्ञात कवींचे / लेखकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाचे नियोजन व क्रम यात लवचिकता असणे साहजिक असल्याने आपल्या स्तरावर यात बदल करू शकता.)

!!  जय हिंद  -  जय भारत  -  जय महाराष्ट्र  !!

क्रीडा स्पर्धा सूत्रसंचालन

  शब्दांकन / निर्मिती : गिरीश दारुंटे, मनमाड

  Copyright Disclaimer  

वरील माहिती  स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने निर्मिती करण्यात आली आहे.

ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

संपूर्ण शैक्षणिक वर्षात साजऱ्या होणाऱ्या, जयंती, पुण्यतिथी व दिनविशेष कार्यक्रमांच्या उपयुक्त pdf, शाब्दिक माहिती व मराठी, इंग्रजी परिपाठासाठी क्लिक करा 👇🏻

www.girishdarunte.com

Previous Post Next Post