पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत | Setu Abhyas Niyojan 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत | Setu Abhyas Niyojan 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत...

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दि. 03/06/2022 चे परिपत्रक

DOWNLOAD HERE .

पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप :

१. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे.

२. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे.

३. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा (शालेय कामकाजाचे दिवस) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (worksheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर अभ्यास मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे.

४. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत.

५. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे.

७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि. ९ जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उत्तर चाचणी दि. २३ जुलै / दि. ६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

पुनर्रचित सेतू अभ्यासाचा कालावधी :

पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :

१. सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी.

३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी.

४. सदर कृतीपत्रिका ( worksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात.

५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे. या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात.

६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत:कडे ठेवाव्यात.

७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी.

८. शालेय स्तरावर पुनर्रचित सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचेसाठी दि. ९ जून २०२२ रोजी उद्बोधन सत्राचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. यामध्ये पुनर्रचित सेतू अभ्यास अंमलबजावणी विषयी सेतू अभ्यासाचे स्वरूप, कालावधी आणि क्षेत्रीय स्तरावर करावयाची कार्यवाही बाबत उद्बोधन करण्यात येणार आहे. सदर ऑनलाईन उद्बोधन सत्राची लिंक आपणास ईमेलद्वारे सूचित करण्यात येईल.

एम. डी. सिंह

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व

प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे - ३०

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻