पंडित नेहरू जीवन परिचय | पंडित नेहरू मराठी भाषण | पंडित नेहरू जयंती भाषणे | बालदिन मराठी भाषण | बालदिन छोटी भाषणे | Pandit Neharu Short Speech | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

पंडित नेहरू जीवन परिचय...

वैयक्तिक आयुष्य :

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.

श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी करण्यात आला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शीनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.

राजकीय आयुष्य :

पंडित जवाहरलाल नेहरु त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. हॅरो व केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १९१२ मध्ये नेहरूंनी बॅरिस्टर ही पदवी घेतली.

पण भारतात परतल्यानंतर काय करायचे असा संभ्रम त्यांना पडला होता. त्यावेळी त्यांना गांधीजी भेटले. त्यांनी दिलेल्या गुरूमंत्राने नेहरूंच्या विचारांची दिशाच बदलली. वडिलांची चांगली चाललेली प्रॅक्टिस त्यांना वारसा म्हणून मिळत होती. मात्र, नेहरूंनी त्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली. विद्यार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रूची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसुकच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.

१९१२ मध्ये ते कॉंग्रेसशी जोडले गेले. १९२० मध्ये प्रतापगड येथे शेतकऱ्यांचा मोर्चा त्यांनी काढला. १९२८ मध्ये सायमन कमिशनविरोधात निदर्शने करताना ते जखमी झाले. १९३० मध्ये मीठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक करण्यात आली. सहा महिने ते तुरूंगात होते. १९३५ मध्ये अल्मोडा तुरूंगात असताना त्यांनी आत्मचरित्र लिहिले. आयुष्यात एकूण नऊ वेळा ते तुरूंगात गेले. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला. सप्टेंबर १९२३ मध्ये पं. नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठीहल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली.

१९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य गेच ध्येय्य निश्चित केले गेले. १९३० ते १९३५ दरम्यान मीठाचा आणि अन्य सत्याग्रहांमुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. १९४२ मध्ये मुंबईत कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांनी जोरदार भाषण केले. त्याचवेळी गांधीजींना करावा मरा चा नारा दिला. दुसऱ्याच दिवशी नेहरूंसह सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी नेहरूंसह काही नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. तेथेच नेहरूंनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया" हा ग्रंथ लिहिला. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली.

पुढे स्वातंत्र्य आंदोलन यशस्वी ठरून देश स्वातंत्र्य होताच, पंतप्रधानपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली. २७ मे १९६४ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते त्या पदावर होते. लोकशाहीला मजबूत करणे, देश आणि घटनेतील धर्मनिरपेक्ष छबी प्रस्थापित करणे आणि भारताच्या विकासात दीर्घकालीन फायद्याच्या ठरतील अशा योजना राबविणे हे त्यांच्या कार्यकाळाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

स्वातंत्र्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्व जगभरात झळाळून उठले. ते फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय नेता बनले. तटस्थ देशांची चळवळ त्यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन झाली.

नेहरूंनी " डिस्कव्हरी ऑफ इंडिया " ग्रंथातून भारताचा गौरवशाली इतिहास तर शब्दांकित केला आहेच पण त्या ग्रंथाच्या पानापानातून ओतप्रोत भरलेला त्यांचा आपल्या देशाविषयीचा जिव्हाळा, त्यातील भारताच्या ऐतिहासिक मानदंडांविषयीची लालित्यपूर्ण वर्णने वाचत गेलो की नेहरूंनी केलंय त्यापेक्षा अधिक लेखन करायला हवं होतं, असं सतत वाटत राहतं. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विविध कारणांनी गौरवल्या गेलेल्या गंगा नदीचं नेहरूंनी या ग्रंथात केलेलं वर्णन वाचलं की नेहरूंच्या त्या सुप्रसिद्ध शैलीची प्रचीती येते.

नेहरूंची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. तुरुंगातून त्यांनी लिहिलेली 'इंदिरेस पत्रे' लेटर्स टू इंदिरा हे त्यांचं आणखी एक स्मरणात - राहिलेलं पुस्तक. नेहरूंनी केलेल्या राज्य कारभारात अनेक त्रुटी, चुकिची धोरणे असतील हे मला मान्य आहे. पण इतक्या मोठ्या देशाचा पसारा सांभाळताना १००% बरोबर कुणीच राहु शकले नसते. तेव्हा नेहरूंना खलनायक ठरवण्याइतके नेमके त्यांनी देशाचे काय वाकडे केले ते ज्ञानी लोकांकडुन जाणुन घ्यायला आवडेल.

अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या आय आय टी सारख्या संस्था तर आज जग विख्यात आहेत. अमेरिकेतल्या निवड विद्यापीठानंतर दर्जाच्या बाबतीत आय आय टी येतात असे वाचल्याचे आठवते. आजच्या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात चीनने जगाच्या मजुरीचा मक्ता घेतला तर भारताने माहिती तंत्रज्ञानाचा मक्ता (पांढरपेषा कामे) घेतला ह्यात मला नेहरूंनी रुजवलेले उच्चशिक्षणाचे महत्व दिसते. भारतातुन जितक्या प्रमाणात गुणवत्ता असणारे अभियंते आज जगभर पुरवले जातात तेवढे इतर कुठल्या देशातुन जात नसावेत असं मला तरी वाटतं.

नेहरूंच्या दुरदृष्टी बाबतीत मला त्यांचे दुसरे एक आठवणारे उदाहरण म्हणजे बॉंबे हाय. भारतात तेलसाठे शोधण्यासाठी भारतीय तंत्रज्ञांनी मुंबईजवळ समुद्रात खोदण्यास सांगीतले होते. त्याचवेळेस जर्मनीहुन बोलावलेल्या आणखी एका तज्ञांच्या गटाने इथे तेलसाठे मिळणार नाहीत असे सुचवले होते. अश्यावेळेस नेहरूंनी आपल्या तंत्रज्ञांवर अधिक विश्वास दाखवला आणि मुंबई जवळ समुद्रात खोदकाम केले. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत तिथे खनिज तेलाचे विपुल साठे मिळाले ज्याचे महत्व आनन्यसाधारण आहे. अशी अनेक छोटी छोटी उदाहरणे शोध घेतल्यास सापडतील.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

Previous Post Next Post