मुलं म्हणजे देवाघरची फुलं...
पंडितजींच्या हृदयातील एक अमुल्य ठेवा होता. मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे, या दृष्टीकोनातून नेहरूंनी आपल्या विकास कार्यक्रमात बाल कल्याणाच्या उपक्रमांना नेहमीच अग्रक्रम दिला. " मुलं काय शिकतात यापेक्षा त्यांच्यावर कोणते संस्कार होतात, हे पालक व शिक्षकांनी पाहिलं पाहिजे", याबाबत ते आग्रही असत.
मुला-फुलांबाबतचा जिव्हाळा नेहरुंच्या रोमारोमात भिनलेला होता. एकदा तर होळीच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी शाळकरी मुलं आली आहेत, हे कळताच मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उठून ते मुलांवर रंग उधळण्यासाठी मुलांच्या दिशेने धावले.
मुठीमुठीने त्यांनी मुलांवर गुलाल उधळला. परंतु आपल्यावर गुलाल उधळण्यास मुले संकोच करीत असल्याच पंडितजींना जाणवलं. मी तुम्हांला मोठा वाटतो का ? असे असेल तर मी खाली बसतो आणि सांगा बघू आता कुठे आहे मी मोठा? झालो की नाही आता लहान! अगदी तुमच्या एवढा ! आता चला उडवा माझ्यावर गुलाल !
आपलं वय विसरुन, आपलं मोठेपण विसरुन ते लहान मुलांमध्ये लहान होत असत. जणू अगदी बाल नेहरुच! मुलांना ते 'देवा घरची फुलं' अशी उपमा देत असतं.
म्हणूनच मुलं पंडितजींना आदरानं चाचा नेहरु म्हणत असतं. 14 नोव्हेंबर हा नेहरूंचा जयंतीदिन खऱ्या अर्थाने 'बालदिन' म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/