एड्स जाणा, एड्स टाळा
एड्स हा खूप भयानक आजार आहे, परंतु याची जाण असेल तर एड्स टाळताही येतो.
एड्स असो वा कोणताही भयंकर आजार किंवा व्याधी असो, याची पूर्व माहिती प्रत्येकाला असावयास हवी. या आजाराची माहिती सर्व ठिकाणच्या शासकीय व पालिकांच्या दवाखान्यात मोफत स्वरूपात मिळते. मात्र याबाबतीत जनमानसात पाहिजे तेवढी जागृती नाही. म्हणून समाजात भयानक व्याधी डोके वर काढत आहेत. आजारांची माहिती झाल्यावर त्या आजाराला सहज टाळता येते किंवा झालेला आजार आहे त्या स्थितीत स्थिर तरी ठेवता येतो. मात्र त्यासाठी त्या आजाराबाबत पूर्ण माहिती व उपाय जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एड्सबाबत खाली माहिती निश्चित प्रबोधनात्मक ठरेल असे वाटते.
◆ एड्स म्हणजे काय ?
मानवी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमी झाल्यामुळे निर्माण होणा-या रोगलक्षणांचा समूह म्हणजे एड्स होय. एड्स म्हणजे ॲक्वायर्ड - संपादित केलेला, इम्यूनो - शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, डेफिशियन्सी कमतरता, सिंड्रोम - लक्षण समूह होय. एच. आय. - व्ही. विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यावर हा टप्पा लगेचच सुरू होतो व काही आठवडे राहतो. एच.आय.व्ही संक्रमित व्यक्ती पूर्णपणे निरोगी दिसते. हा कालावधी तीन महिने ते १५ वर्षे असू शकतो. तो व्यक्तीच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर अवलंबून असतो.
◆ एड्स झाल्याचे कोणत्या अवस्थेत समजते ?
एच.आय.व्ही. चा विषाणू शरीरात रोगप्रतिकारक संस्थेच्या पेशीवर हल्ला करून त्या नष्ट करतो. नष्ट झालेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी वेगाने निर्माण होत नाही. या पेशींच्या कमतरतेमुळे बाधित व्यक्ती क्षयरोग, कँडिडियासीस नागीण इत्यादी विविध संक्रमणांमुळे आजारी होते. एच. आय. व्ही. संक्रमणाची अंतिम टप्प्याची म्हणजेच एड्सची सुरुवात येथून होते. तोपर्यंत बाधित व्यक्ती तिस-या अवस्थेत असते.
◆ एड्सची लक्षणे :
बाधित व्यक्तीचे वजन शेकडा दहा टक्क्याने कमी होते.
एक महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला येतो.
एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ सतत जुलाब होतात.
अंगावरील त्वचेवर वारंवार खाज येते.
बाधित व्यक्तीच्या तोंडात व घशात फोड येतात.
लसिका ग्रंथींची सूज जास्त काळ राहते...
ही प्रमुख लक्षणे ज्या व्यक्तीत दिसतात ती एड्सग्रस्त व्यक्ती समजावी.
◆ एड्स कसा पसरतो ?
एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास एड्स पसरतो. एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीची इंजेक्शन व सुई अबाधित व्यक्तीसाठी वापरल्यास एड्स पसरतो. तसंच एच.आय.व्ही. बाधित रक्त दिल्यासही एड्स पसरतो. एच. आय. व्ही. बाधित पालकांकडून त्यांच्या नवजात अर्भकासही होऊ शकतो.
◆ एड्स कसा टाळता येतो ?
एड्स सहज टाळता येऊ शकतो. यासाठी खालील बाबींची काळजी घेतल्यास एड्स टाळणे प्रत्येकाला शक्य आहे...
रक्त घेण्याची वेळ आली तर एच. आय. व्ही. मुक्त रक्त व रक्तघटकांचा वापर करावा.
इंजेक्शन घेण्यासाठी प्रत्येक वेळी नवीन सिरींज आणि सुईचा वापर करावा.
गुप्तरोग झाला असल्यास त्यावर डॉक्टरकडे जाऊन त्वरित उपचार करावा.
पालकांकडून बाळाकडे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व प्रकारची उपाययोजना करावी.
दाढी-कटिंग करताना न्हाव्यालासुद्धा नवीन ब्लेड वापरण्याचा हट्ट धरणे.
एड्सग्रस्ताचे नेलकटर व ब्लेड वापरू नये, कारण यामुळे एड्स होण्याची शक्यता असते.
◆ खालील गोष्टींमुळे एच. आय. व्ही. प्रसार होत नाही :
एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने एड्स होत नाही. तसेच त्या व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने, गळाभेट घेतल्याने किंवा एड्स बाधित व्यक्तीला डसलेला डास अबाधित व्यक्तीला चावला तरी एड्स होत नाही. याशिवाय एच. आय. व्ही. बाधित व्यक्तीसोबत जेवण केल्यास किंवा त्या व्यक्तीची भांडी वापरल्याने तसेच कपडे वापरल्याने किंवा एकाच स्नानगृहाचा किंवा शौचालयाचा वापर केल्यानेही एड्स होत नाही. एच. आय. व्ही. बाधित व्यक्तीची सेवा-शुश्रुषा केल्यानेही एड्स होत नाही.
◆ एड्स झाल्यास लपवून ठेवू नये :
बरेच रुग्ण एड्स झाल्याचे निदान होताच तो लपवून ठेवतात हे योग्य नाही. त्याने घरातील सदस्यांना याबाबत माहिती द्यावी व उपाययोजना व उपचार करण्यासाठी त्यांचे सहकार्य घ्यावे. एड्स लपवणे म्हणजे या आजाराची दुस-याला बाधा करणे होय.
याशिवाय सरकारी दवाखाने, उपजिल्हा रुग्णालये या ठिकाणी एड्सबाबत समुपदेशन केंद्रे आहेत. तिथे जाऊन ही माहिती घ्यावी. एड्सची माहिती जाणा आणि एड्स टाळा. कारण एड्सची माहितीच एड्सपासून बचाव करू शकते कारण यावर औषध नाही. औषध म्हणजे एड्सची पूर्ण माहिती जाणून घेणे. ए.आर.टी. उपचार केंद्रात रुग्णांनी जाऊन जीवनमान सुधारावे. एच. आय. व्ही. एड्ससंबंधी गैरसमजुती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी लोकांना अचूक व संपूर्ण माहिती व प्रबोधनावर अधिक भर द्यावा. यामुळे लोकांना या रोगाचे गांभीर्य कळेल व ते गैरमार्ग टाळतील.
जागतिक एड्स दिन १ डिसेंबर सारख्या कार्यक्रमांतून लोकांमध्ये जनजागृती मोहीम पुढे नेण्यासाठी र्सवकष प्रयत्न व्हावेत. कारण एड्सबाबत खडान् खडा माहिती समाजातील स्त्री- पुरुषांनी जाणून घेण्याची नितांत गरज आहे. एड्सबाबत माहिती संकलित करा. तिचे वाचन करा व इतरांनाही याची माहिती द्या. दुष्परिणामांबाबत जागृती करा तरच एड्सला आळा बसेल.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
-------------------------------
इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

Previous Post Next Post