पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इ. ५ वी अभ्यासक्रम, विषय : गणित
घटक 1 संख्याज्ञान . .
उपघटक :
१. आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
२. दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन
३. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी
४. मोठयात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
५. संख्यांचा चढता-उतरता क्रम व तुलना
६. १ ते १०० संख्यांवर आधारित प्रश्न
७. सम विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या
भारांश : १२%
घटक २ संख्यांवरील क्रिया . .
उपघटक :
१. बेरीज ( सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची बेरीज, शाब्दिक उदाहरणे
२. वजाबाकी ( सात अंकी संख्यांपर्यंत) हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे
३. गुणाकार (पाच अंकी गुणिले तीन अंकी संख्येपर्यंत)
४. भागाकार (पाच अंकी भागिले दोन अंकी संख्येपर्यंत)
५. पदावली व अक्षरांचा उपयोग
६. संख्यांचे विभाजक (अवयव) व विभाज्य, एक ते दहा पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोटया
भारांश : २०%
घटक ३ अपूर्णांक . .
उपघटक :
१. व्यवहारी अपूर्णांक
अ) समच्छेद व भिन्नच्छेद अपूर्णांकाचा लहानमोठेपणा, चढता उतरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार
ब) अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक परस्पर रूपांतर
क) सममूल्य अपूर्णांक
२. दशांश अपूर्णांक
अ) वाचन, लेखन
ब) स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांक उपयोग
क) बेरीज, वजाबाकी
भारांश : १४%
घटक ४ मापन / महत्त्वमापन . .
उपघटक :
१. लांबी, वस्तुमान, धारकता (दशमान परिमाण) - परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे.
२. कालमापन : घडयाळ (मध्यान्हपूर्व, माध्यान्होत्तर) तास, मिनिटे, सेकंद परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी व शाब्दिक उदाहरणे
३. दिनदर्शिका
४. कागदमापन (रीम, दस्ता)
५. नाणी- नोटा (रूपये-पैसे)- परस्पर रूपांतर, मूलभूत क्रियांवर आधारित खरेदी व विक्रीसंबंधी उदाहरणे.
भारांश : २०%
घटक ५ व्यावहारिक गणित . .
उपघटक :
नफा-तोटा, शेकडेवारी, सरळव्याज ( प्राथमिक माहितीवर आधारित उदाहरणे )
भारांश : १६%
घटक ६ भूमिती . .
उपघटक :
१. कोन व त्यांचे प्रकार
२. समांतर व लंब रेषा
३. त्रिकोण, चौरस, बाजू, शिरोबिंदू
४. वर्तुळ - त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परिघ, अंतर्भाग, बाहयभाग, वर्तुळकंस
५. परिमिती- त्रिकोण, आयत, चौरस, बहुभुजाकृती
६. क्षेत्रफळ- आयत, चौरस
७. त्रिमिती वस्तू व घडणी
८. आकृतिबंध
९. इष्टिकाचिती व घन (कडा, शिरोबिंदू, पृष्ठे)
भारांश : १४%
घटक ७ चित्रालेख . .
उपघटक :
चित्ररूप माहितीचे आकलन
भारांश : ०४%