सूत्रसंचालन चारोळ्या | Anchoring Quotations

!! दिपप्रज्वलन !!

अतिथींच्या आगमनाने

गहिवरले आज हे सेवासदन

अतिथींना विनंती, करूनी दिपप्रज्वलन

प्रसन्न करावे वातावरण


एक छोटीसी ज्योत

प्रतिक म्हणून काम करते

थोडासा का होइना

पण अंधार दूर करते.


जीवनाला हवी प्रकाशाची साथ

दिव्यामध्ये जळते छोटीशी वात

तरीही तिला आहे मानाचे स्थान

तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया

आजच्या कर्यक्रमाची सुरूवात.


संस्कृती आहे आपली प्रकाशाची

शितलता आहे त्यात चंद्राची

दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची

हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची


!! प्रास्ताविक !!

गुरूजनांचा आशिर्वाद घेवून

साथ दयावी सर्वांनी मिळून

आजच्या कार्यक्रमाचा उद्देश

जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून


प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान

ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान

आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेचे ज्ञान


जीवनाचे सार कळते

ग्रंथ आणि पुस्तकातून

अन कार्यक्रमाचा उद्देश

कळतो प्रास्ताविकातून


!! मार्गदर्शन !!

तेज तुमचे आहे

सुर्य चंद्राहूनही जास्त

तुमच्या या बोलण्यातच आहे

जीवनाचे संपूर्ण शास्त्र

ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून

कळस गाठु प्रगतीचा

त्यासाठी मान आहे

अध्यक्षीय मार्गदशनाचा


बोलके करण्यास हवे असते संभाषण

आधारासाठी हवे असते आश्वासन

योग्य दिशा मिळण्यासाठी

आवश्यक आहे मार्गदर्शन


!! आभार प्रदर्शन !!

कार्यक्रम झाला बहारदार

भाषणही झाले जोरदार

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार


प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली

आतिथींच्या येण्याने

कार्यक्रमाला शोभा आली

आपल्या मार्गदशर्नाने आम्हाला

एक नवी दिशा मिळाली

आणि शेवटी आता...

आभारप्रदर्शनाची वेळ आली.


थेंबाथेंबाने तलाव भरतो

हाताहाताने कार्यक्रम फुलतो

जेथे जेथे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार

मानलेच पाहिजेत त्यांचे आभार


वसंतात येतो फुलांना बहार

तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार

   संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक  

 ━━━━━━━━

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

━━━━━━━━

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

━━━━━━━━

Previous Post Next Post