निरोप समारंभ शायरी
घेतांना निरोप शाळेचा....!!
घेतांना निरोप शाळेचा
आले भरूनिया डोळे,
१० वर्षांतील दिवस बनले
स्मरणाच्या पुस्तकातील पाने.
आले तेव्हा होते सारेच मातीचा गोळा,
घडविले शिल्प या मायेने आता.
कुंडीतल्या मातीतले लहानसे रोपटे,
उद्या लागणार जगाच्या मातीत.
शाळा म्हणजे घर अशी मनाची पकड,
घेताना आज निरोप त्या घराचा.
प्रश्न पडला हा सगळ्यांना,
कशी विसरायची ही आई?
जिने दिले वळण आयुष्याला
आता करूनही इच्छा
नाही येणार बसता
प्रेमाच्या विटांनी बांधलेल्या
भिंतीच्या त्या वर्गात.
शिक्षकांच्या मायेची, प्रेमाची होती साथ
त्यांच्याच कठोरपणाच्या आधारावर
झाले सर्वच गुणवान.
एकच वास्तू देते आईची माया
व तीच दाखवते वडिलांची कठोरता.
प्रेम, बंधुता, माणुसकीची शिकवण जिची
झाशी, शिवबांची शिकवली थोरता जिने
वैज्ञानिकांच्या शोधांचे दिले धडे जिने,
उद्याच्या जगाला तोंड देण्यासाठी
दिले आव्हान जिने.
आज त्याच शाळेचा निरोप घेणार...
नाही करवत ही कल्पना आता
पहिल्या दिवशी होती मनाची जी स्थिती,
आज जातानाही मन तसेच झाले.
येताना होती भीती मनात,
पण जाताना प्रेमाची आठवणीची शिदोरी.
जगात झाले सर्व जरी विद्यावान,
तरी प्रत्येकाकडची ही शिदोरी
कधीच नाही होणार शिळी.
- कु. संजीवनी जोशी
श्री. मंगुथाई दत्ताणी विद्यालय, बोरिवली
शाळेचा हा निरोप आता...!!
शाळेचा हा निरोप आता
आले मन आठवांनी भरुन
मैत्री-प्रेमानी भिजले मन,
डोळे गेले अश्रुधाराने भरुन
निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी
निरोप तुमचा घेताना लागे ठेच उरी
तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी
यादों की झड़ी सी है आँखों में छाई,
हो रही आज आपकी विदाई
हम करते हैं ईश्वर से प्रार्थना,
आपकी जीवन की हर कामना पुरी ।
यादे संजोकर आँखें भीगोकर,
जा रहे हो यहाँ से विदा होकर
करते है प्रार्थना यहीं
जहाँ भी जाओ सफलता ही पाओ।
मिली-जुली खुशी-गम के भावनाओं के साथ
शुभकामना है आज विदाई के इस मौके में
कि हो तुम्हारे जीवन की शुभ शुरुआत ।
विदाई की है घड़ी है मुश्किल बड़ी,
कामना जीवन की तुम्हारी हो पूरी,
यही है शुभकामना हमारी ।
जाने वाले को कहाँ रोक सका है कोई,
तुम चले हो तो कोई रोकने वाला भी नहीं ।
विदा होकर आज यहाँ से चले जाओगे,
पर आशा है यही की जहाँ भी जाओगे,
खुशीयाँ ही पाओगे ।
विदाई का है दिन है मन में है ये आशा,
पूरी हो तुम्हारी हरेक अभिलाषा ।
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉