शिवरायांचे बालपण | Childhood of Raja Chhatrapati


शिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरीवर झाला. नंतर तीन चार महिन्यांनी शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधीयुक्त केले. पुढे वर्ष दीड वर्ष हे सर्व कुटुंब शिवनेरी वरच एकत्रित होते. त्या नंतर १६३२ ते १६३६ ह्या दरम्यान शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला त्या मूळे १६३२ ते १६३६ मध्ये शहाजी महाराज आणि संभाजी राजे मोघालांशी लढण्यात मग्न होते. पुढे १६३६ च्या उत्तरार्धात निजामशाही बुडाल्यावर शहाजी राजे आदिलशहा कडे बारा हजारी " फर्जंद " वजीर म्हणून गेले.

तहाप्रमाणे शहाजी महाराजांना रानदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात घाईने जावे लागले. तहा प्रमाणे गडकोटांचा ताबा मोगली सरदारांनी त्यांचे पश्चात घेतला व बादशहाच्या आज्ञे प्रमाणे जिजाई वगैरेंना शिवनेरी वरून आपल्या सर्व जीनगी वगैरेसह उतरू दिले. प्रथम जिजाबाईंना चौलात ठेवायचा शहाजींचा प्रयत्न होता. परंतु पोर्तुगीजांनी जिजाबाईंना त्यांच्या हद्दीतून नेऊन इतरत्र ठेवण्याची सूचना केली. तेव्हा शहाजी राजांनी शिवाजी व जिजाई यांना खेड (शिवापूर) ला पाठविले. तिथे त्यांचा वर्षभर मुक्काम होता. खेड (शिवापूर) हे दादाजी कोंडदेवाने शहाजी महाराजांच्या आज्ञेवरून नुकतेच वसवले होते.

पुढे इ.स.१६३७ च्या अखेर जिजाई शिवाजींसह कर्नाटकात गेल्या असे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. कर्नाटकात कंपिलीला शहाजी राजांच्या सोबत १६३७ ते १६४२ साला पर्यंत शिवाजी आणि जिजाऊ हे तिथेच होते. तिथे शहाजी महाराजांनी शिवाजी ७ वर्षाचे झाल्यावर अक्षर ओळख व जुजबी गणित त्यावेळच्या पद्धतीने शिकवले. त्या काळी एवढेच काय ते शिक्षण "अध्ययना " खाली त्रैवर्णिकांना दिले जात असे. परंतु वडिलांच्या व्यावहारिक अनुभवाचा मुलांना पूर्ण वाटा घेता येत होता. वैश्यांना आपल्या हिशोबापुरता लेखन वाचनाचा सराव असे. क्षत्रिय आणि ब्राह्मणांना अक्षर ओळखी नंतर, जर त्यात धंदा रोजगार करावयाचा असेल तरच तो या संस्कारानंतर अधिक लेखन वाचनाचा सराव करी अन्यथा वंशातील मोठ्या माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या कडून पारंपारिक कला कौशल्य शिकत असे. त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी महादेव भटाकडून अक्षर ओळख करून घेतली व तलवारबाजी, घोडेस्वारी व इतर अन्य कला त्या त्या क्षेत्रात माहीर असणाऱ्या व्यक्तींकडून याच काळात शिकून घेतले आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे राजनीती चे डाव पेच अथवा राजकारभाराची कार्यपद्धती हे सर्व शिवाजी महाराजांनी ह्या काळात आपले वडील शहाजी महाराज व वडील बंधू संभाजी महाराज ह्यांच्याकडून शिकले.

याच दरम्यान १६४० च्या अखेरीस शिवाजी महाराज यांचे लग्न निंबाळकर पवार यांच्या "जिऊबाई" नावाच्या मुलीशी झाले. तिचे सासरचे नाव सईबाई असे ठेविले. पुढे १६४२ साली शहाजी महाराजांविरुद्ध . आदिलशाहीतील कारस्थाने वाढली रन्दुल्लाखान मेल्यावर त्याचा पोरगा कमकर्तुत्वी निघाल्याने अफजलखानाला त्याची जहागीर मिळाली व त्याने बाजी घोरपड्यासारखे सरदार गोळा करून शहाजी महाराजांविरुद्ध कारस्थान रचले.

त्या नुसार शहाजी महाराजांचा बराच प्रदेश त्यांच्या कडून आदिलशाहने काढून घेतला व त्यांचेच भाऊबंद बाजी घोरपडे यांना दिला तसेच शहाजी राजे ह्यांचे मुतालिक दादाजी कोंडदेव ह्यांची बाही बाजी घोरपाड्याने कापली. हे सर्व बघून आदिलशाहीतील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे बघून शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या सोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्यांनी आदिलाशहाशी लावून ठेवले. १६४२ च्या अखेर शिवाज राजांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्या सोबत पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणेप्रांती रवाना केले ह्या मूळे शहाजीराजे मोघलांशी संधान साधताय कि काय ह्याची भीती आदिलाशाहाला झाली त्या मूळे आदिलशाहने शहाजीशी चाललेल्या वादावर पडदा टाकत शहाजी राज्यांना काढून घेतलेल्या जहागिरी पेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला.

१६४४ साली आदिलशाहने शहाजी राजांची  आधीच्या ( काढून घेतलेल्या ) ४ लक्षजहागिरी ऐवजी ५ लाखाचा सुभा बंगलोर दिला व तिकडे रवाना केले (अर्थात शहाजी राज्यांसारख्या प्रबळ सरदाराचे मोघलांकडे जाणे चांगले नाही ह्या भीतीने शहाजीराजांशी आदिलशाहने जुळवून घेतले व इकडे मोघालांशी संधान साधायला नको म्हणून तिकडे कर्नाटकात बंगरूळला रवाना केले इथे शिवाजी महाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजी राज्याकडून त्या प्रकारची बंडयुक्त कार्य करण्याचे आदेश पाठवले होते परिस्थितीचा फायदा उठवण्यात शहाजी राजे पुन्हा एकदा यशस्वी झाले.

अवघ्या १२-१३ व्या वर्षी शिवाजीराजांना स्वतंत्र वाटचाल करावी लागली पण स्वतः शहाजी महाराज व शिवाजी महाराजांचे वडील बंधू संभाजी महाराजांवर देखील याच वयोमानात अश्या प्रकारची जवाबदारी अंगी पडली होती हे नमूद करण्यासारखे आहे तर शहाजी महाराजांवर त्यांच्या लहानपणी (१० व्या वर्षी ) अश्याच प्रकारे जवाबदारी पडली असतांना त्यांना त्यांचे थोरले चुलत बंधू संभाजी राजे ह्यांचा आश्रय अथवा मार्गदर्शन मिळाले तर शिवाजी राजांचे वडील बंधू संभाजीराजे यांना तर अशा (९ व्या वर्षी) वेळेत स्वतः शहाजी राजांचे मार्गदर्शन मिळाले. शिवरायांना मार्गदर्शन मिळाले ते जिजाऊंचे. याच राजमातेने मग पुढे चालून स्वराज्याला पहिले छत्रपती दिले.

इतरही शिवजयंती उपयुक्त माहिती

शीर्षकावर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇

📲  सूत्रसंचालन-निर्मिती-गिरीश दारुंटे

📲  Audio Flipbook-गिरीश दारुंटे

📲  शिवजयंती प्रास्ताविक-गिरीश दारुंटे

📲  चारोळ्या-निर्मिती-गिरीश दारुंटे

📲  शिवस्तुती-प्रेरणामंत्र

📲  शिवजयंती-पोवाडा

📲 शिवजयंती-फलक लेखन


 📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post