सह्याद्रीच्या रांगांवरती
सदा मुघलांच्या नजरा ।
बोटे छाटली तयांची
त्या शिवबांना माझा मुजरा ॥
किती आले किती गेले
केले मुघलांना हद्दपार ।
राजे जाहले बहु धरतीवरती
ना कुणा शिवबांची सर ।
अशी करारी नजर सदा
गनिमा भेदुनी पाही आरपार ।
शिवरायांमुळेच जाहले
स्वप्न स्वराज्याचे साकार ॥
सदा गायी तुझे गुणगान
असा माझ्या पोटी वंश दे ।
फक्त तुझ्याच.. फक्त तुझ्याच..
शिवशौर्याचा तू अंश दे ।।
शब्दही पडती अपुरे
अशी शिवरायांची किर्ती ।
राजा शोभूनी दिसे जगती
अवघ्या जगाचा शिवछत्रपती ।।
अंगी संचारीता शौर्य
थरथरा कापे क्रौर्य ।
जणू कडाडती वीज
भासे तेज शिवशौर्य ॥
न्यायदानाची जयांची
असे त-हाच निराळी ।
लेणे सौभाग्याचे शाबूत
असे शिवशौर्यामुळे भाळी ।।
मायमाऊलीच्या स्त्रीत्वाचा
शिवबांनी केला सदैव सन्मान |
यमसदनी धाडुनी सैतानांना
राखीली स्वराज्याची शान ।।
न काळवेळ तयांना लागे
शत्रू धारातीर्थी पाडाया ।
स्मरता शिवरायांचे शौर्य
लागे आजही इतिहास घडाया ।।
डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच
आजही वाजतोय जगती ।
राखीले स्वराज्य अबाधीत
असे हे एकमेव शिवछत्रपती ।।
राजे तुम्हीच अस्मिता,
तुम्हीच महाराष्ट्राची शान |
जगती तुम्हीच छत्रपती,
तुम्हीच आमचा स्वाभिमान ।।
रचना : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
Copyright Disclaimer : वरील साहित्य स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने तयार करण्यात आले आहे. ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.
इतरही शिवजयंती उपयुक्त माहिती
शीर्षकावर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇
📲 सूत्रसंचालन-निर्मिती-गिरीश दारुंटे
📲 Audio Flipbook-गिरीश दारुंटे
📲 शिवजयंती प्रास्ताविक-गिरीश दारुंटे
📲 चारोळ्या-निर्मिती-गिरीश दारुंटे
🎙️ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषणे
👇👇👇👇👇👇👇👇👇
↪️ शिवछत्रपती - स्वराज्याचे दैवत
↪️ महानयोद्धे शिवछत्रपती-इंग्रजी 1
↪️ राजे शिवाजी भोसले-इंग्रजी 3
📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻