राष्ट्रसंत गाडगेबाबा 

(डेबूजी झिंगराजी जानोरकर)

शाळा पडू द्यालेकरं मरु द्या,पण

मंदिरमजित बांधा बापहो...

सोन्याचा कळस चढवा त्यावर,

उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात...

बाजारात विकत मिळणारी मुर्ती,

जर माणसाच्या जिवनात सुख समृध्दी आणत असेल तर ..

विकणारा काय खुळा आहे का ?

का मुर्ती घडवणारा खुळा आहे?

तो स्वताचे भले करण्याऐवजी बाजारात देव मांडुन त्याचा व्यापार कशाला करील.

 हे कधी कळेल माझ्या बांधवाला?

त्याऐवजी शाळा शिकाशाळेला पेका लावा

तुमची लेकरं शिकतीलशिक्षणाला धरम माना।

बापहो तरच तुमचा उद्धार होईल

                                             - राष्ट्रसंत गाडगेबाबा

बुद्धांनी हिंसा नाकारली तेच बाबांनी ज्या ठिकाणी म्हशीकोंबड्या, रेडेबकरे बळी दिले द्यायचे त्या त्या ठिकाणी जीवदया संस्था स्थापन केल्या.  बाबाच्या आंदोलनाला कांऊटर करण्यासाठी गांधीनी अहिंसासाफसफ़ाइचे उपक्रम सुरु केले. आणि समाजात गांधीनी ब्राह्मण ब्नियाच्या वर्तमान दैनिकातून स्वतची वाहवा करून घेतली.बाबाच्या कार्याने त्यांना थांबयाला वेळ मिळत नव्हता. रत्नागिरी  खारेपाटण येथे कीर्तनाला सुरुवात केली तोच ५ ते १९२३ ला गोविंद (बाबांचा मुलगा) पागल कुत्राच्या चाव्याने मृत झाल्याने कळलेबाबा म्हणतात...

'गेले कोटी कोटी काय रडू एका साठी' 

बाबांनी कीर्तन सुरु केले. देवदासी जोगती मुर्ळीच्या प्रथा ब्राह्मणा पडल्या होत्या या प्रथेत मुली देवाच्या नावाने सोडल्या जात त्याची लाग्ने देवाशी लावत व त्याचा उपयोग ब्राह्मण पंडेपुरोहित घेत ती प्रथा बाबांनी मोडली. देव मोठा कि माणूस मोठा लोक सांगत देव मोठा बाबा म्हणत देव मोठा तर त्यांने तुम्हाला द्यायला पाहिजे तुम्हीच त्याला नारळ पेढेलाडू,प्रसाद,फळे चढवटताततो खातही नाही मह तुम्ही का दगडाच्या मुर्त्यासमोर ठेवतात. त्याला कपडेही तुम्हीच घालतात त्याची अंघोळ तुम्हिच घालतात मग तो कसला देव ?

ईश्वरआत्माब्राह्यधामभोंदुगिरीकपटनितीफसवणूकअहमपणा या टाकाऊ गोष्टी बाबांनी नाकारल्या ते उपदेश करताना म्हणत...

मेरा कोई शिष्य नहि हैऔर मै किसी का गुरु नाही हु! स्वयप्रेरणा से प्रपच के मोह को त्याग कर जो कोई इच्चामुक्त होकार दिनोद्धार के और अनपढ गरीब लोगो के देवधर्म के बरे मे लगा हैवे सभी मेरे अनंत जन्म के गुरु है!

बाबांचा जनकल्याणाचा संदेश :

बाबांना (बाबासाहेब आंबेडकरान विषयी) अत्यंत आदर होता. " काही दिवस जगायचे होते. पुष्कळ काम राहिलेबाबासाहेबांच्या निर्वनानंतर त्यांनी हळूहळून उद्गार काढले. बुद्धाचा सिद्धांत सांगणारे बाबा खरे भिक्षु होते. अन्यायअज्ञानवेदना दिसल्या किते जगिक थांबून त्याचे निरीक्षण करीत व त्याला न्याय दिल्याशिवाय पुढे जात नसत.

डॉ. बाबासाहेबांनी एक महत्वाची खबर धर्मातारापर्यंत पोहोचली. कदाचित डॉ. बाबासाहेबानी बाबांनाच प्रथम त्याचे विश्लेषण सांगितले असावे. गाडगेबाबा मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटल शेजारी असलेला  आश्रम शाळेचे काम पाहत होते. बाबासाहेबांनी निरोप पाठवीला 'मला (हिंदुत्व सोडून) धर्मांतर करायचे आहे. मी आपल्याबरोबर चर्चा करू इच्छितोबाबांना निरोप मिळताच डॉ. बाबासाहेबाना ते कुलाबा येथे येऊन भेटले. बराच वेळ चर्चा झाली. गाडगेबाबा खुश झाले. "डॉ. तुम्ही करणार ते योग्य असणार सारा समाज तुमच्या पाठीशी आहे."        डॉ. बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. बाबा मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. मी बुद्धाला स्वीकारणार आहे. हा समारंभ नागपूर येथे होणार आहे. बाबासाहेब या चांगल्या कार्यात यशस्वी होतीलअशी आशा करून गाडगेबाबा तेथून न थांबता तेथून निघून गेले. गाडगेबाबा जास्त वेळ बाबासाहेबांसोबत थांबत नसत. बाबासाहेबांवर फारमोठी जबाबदारी आहे, असे त्यांना वाटे. त्याचा बहुमोल वेळ वाया जाऊ नये असा ते विचार करीत. आणि इतरांसोबत ते जास्त ते जास्त वेळ घालवत  नसत. त्यात त्यांचा वेळ वाया जाणार नाहीयाची त्यांना चिंता होती.

आईकळावणी (मुलगी) मुलगा गोविंद बाबापासून दूर गेलेत तरी बाबांनी त्याचा थांगपत्ता घेतला नाही. समाज आणी त्याचे उत्थान हाच बाबाचा परिवार. 

बाबांनी तुकारामचोखामेळा यांचा आदर्श घेतला आणी बाबा सतत चालत राहिले. समोरासमोर प्रहार केलेत. लोकांनी अधिकार म्हणून त्यांना मारहाण केलीत्यांनी सोसलेदेव धर्माच्या नावाने यात्रेला व जत्रेला जाऊ नका असे गाडगेबाबा अज्ञानी व पीडित समाजाला सांगत. परंतु भटपुरोहितबडवेपंडे त्यांचे विचार खोटे  ठरवण्यासाठी समाजाला फसवित. ऊनवारापाऊसवादळदिनरात्र न पाहता भुके व अनवाणी भटशाहीला बळी पडत. जातीच्या नावाने अस्पृश फासत व जातीच्याच नावाने ब्राह्मण या अज्ञान समाजाला फसवत. त्यात जखमी होतकोणी मेलेरीयाहैजागैस्टोमहामारीरोगांनी  गरीब जनतेचे बळी जात असेया जीवघेण्या रोगात जर बळी गेलातर देवाच्या दरी जागा मिळाली असा प्रचार-प्रसार ब्राह्मण अंगात ताप असतानाही लोक पंढरपुरला जात. त्या ठिकाणी हलकी जातीची माणसं म्हणून त्यांना ऊनपावसात कोणीही घराचा छपराचा आसरा देत नसत.

१४ जुलै १९४१ ला बाबाची प्रकृती ठीक नव्हती. महानंद्सामी नावाचा त्याचा चाहात्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाड्गेबाबाची खबर दिलीबाबासाहेब तेव्हा भारताचे पहिले कायदेमंत्री होते. आणि त्यांना अर्जंट दिल्लीला जायचे होते. जास्त वेळ नव्हता सायंकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. मात्र बाबाचा निरोप मिळालात्यांना दुख झाले. सर्व कामे बाजूला ठेवली. दोन घोंगड्या विकत घेतल्या व महानंदस्वामी सह ते बाबा ज्या खासगी रुग्यालयात होते तेथे गेले. बाबासाहेब येताच बाबा उठून बसले. कुणाकडून काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबाच्या दोन घोंगड्या स्विकारल्या. "डॉ. तुम्ही कशाला आलेतमी एक फकीरतुमचा किती मोठा अधिकार तुमचा एक मिनिट (देशासाठी) महत्वाचा आहे". गाडगेबाबा डॉ. बाबासाहेबांना म्हणाले. त्यावर बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा आहे. उद्या खुर्ची गेली तर मला कोणीही विचारणार नाही. "तुमचे अधिकार अमर आहेत.या भेटीत डॉ. बाबासाहेबाच्या डोळ्यात निश्चित अश्रू जमा झाले असावेत. कारण हा ऐतिहासिक प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनात परत येणार नव्हताहे बाबा आणी बाबासाहेब जाणून होते.

(ढोंगी) बाबाबुवापाखंडीवैरागीसाधू-संन्यासी अशा लोकापासून बाबा आणी बाबासाहेब दोन्ही दूर होते. परंतु गाड्गेबाबाचे बाबासाहेबांवर अफाट प्रेम होते. समाजासाठी ते आंदोलन चालवत होते. पायाला स्पर्श न करू देणारे हे महान संत. समानतेने अभिवादन करणारे संत. समानतेने व समतेने अभिवादन करणाररे संत होते. बाबांनी कपाळावर टिळागंधभस्म लावला नाही,  न अंगावर भगवे कपडे घातलेगळ्यात धागा,  दोरा,  माळा घातल्या नव्हत्यास्वत: फार मोठा विद्वानसाधूसंन्याशीसंत,  आचार्य पंडितस्रमाट जोगी मानले नाही. किवा उच्च आसनावर बसले नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बाबांचे किर्तन ऐकत. जेव्हा बाबासाहेब किर्तन ऐकून आपल्या पुढील कामासाठी निघत, तेव्हा गाडगेबाबा आपल्या किर्तनकार मंडळींना        डॉ. आंबेडकर कि जय अशा घोषणा देत. मनमाड येथे १९४२-४३ ला गाडगेबाबांनी बाबासाहेबांना शोषित-पिडीत  समाजाचे उद्धारक म्हटले. बाबासाहेबांची महानिर्वानाची बातमी गाडगेबाबांनी ऐकली आणि त्यांनी दवाऑषधी घेण्याचे सोडले. ते खचून गेलेकरोडो समाजाला ते सोडून गेले आणि त्यांनी त्यासंदभार्त उदगार हि काढलेबाबासाहेबांची दु:खद बातमी कळली तेव्हाचा बाबांचा अमर संदेश...

"बाप होदेव न तिर्थात ना मूर्तीत तो दरिद्रीनारायणाच्या रुपात तुमच्या समोरच उभा आहे."

तन मन धनाने बाबांचे मिशन बहुजन समाजाला पूर्ण करायचे आहे. बाबा पुढे चालत राहिले-मागे  कीर्ती वाटत गेली!

राष्ट्रसंत गाडगेबाबांची दुर्मिळ छायाचित्रे



माहितीस्त्रोत : आंतरजाल - whatsapp समूह

संकलक : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

------------------------------
इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

------------------------------

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

Previous Post Next Post