भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रम
भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रम

मराठी भाषेच्या संवर्धन तसेच भाषा वृद्धीगंत होण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषेच्या वापरासंदर्भात शासकीय कार्यालय सोबतच शैक्षणिक संस्थांचा सहभाग वाढावा या उद्देशाने सन २०१३ पासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दि. १४ ते २८ जानेवारी २०२3 या कालावधीत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. या पंधरवड्यामध्ये मराठी भाषा संवर्धनासाठी उपलब्ध परिस्थिती व परिसरातील वातावरण याला अनुसरून खालीपप्रमाणे किंवा त्याअनुषंगाने उपक्रम राबवून आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी.

दिनांक १४ ते २८ जानेवारी २०२3 या कालावधीत घ्यावयाचे उपक्रम...

शालेय विद्यार्थ्यामध्ये मराठी भाषेची जाणीव होण्याकरिता नाट्य प्रयोग, काव्य गायन, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, काव्य लेखन, फॅन्सी ड्रेस / वेशभूषा (मराठी लेखक / कवी व साहित्यकार), भजन संध्या इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेची बक्षिसे व प्रमाणपत्र शालेय स्तरावर देण्यात यावे. शाळेचे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी खुले करावे व प्रत्येक विद्यार्थ्यांना पंधरवाड्यात ५ ते १० पुस्तके वाचनासाठी मिळतील या बाबत मुख्याध्यापकांनी योग्य ते नियोजन करण्यात यावे.

१) मराठी भाषा व वाड्:मय : परिसंवाद / व्याख्याने / कार्यशाळा / शिबिरे / कविसंमेलन / एकांकिका / बालनाट्य / नाटके / पुस्तक प्रकाशन / साहित्य पुरस्कार.

२) विविध स्पर्धा : निबंध / प्रश्नमंजुषा / कथाकथन/चारोळी लेखन / कथा लेखन/ हस्ताक्षर / शुद्धलेखन / वक्तृत्व / घोषवाक्ये / अभिवाचन / वादविवाद / अंताक्षरी / शब्दकोडी.

३) वाचन संस्कृती : अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन / परिसंवाद / कार्यशाळा.

४) साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम : ग्रंथप्रदर्शन / ग्रंथदिंडी / माहितीपट / काव्यवाचन.

५) यशस्वी व्यक्तींची ओळख : वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषक व्यक्तींचा सत्कार, मुलाखती घेणे.

६) अमराठी भाषिकांसाठी : राज्यातील मराठी भाषकांना मराठी भाषेचा सुलभ पद्धतीने परिचय करून देण्याच्या दृष्टीने कार्यशाळा/ भाषेसंबंधी स्पर्धांचे आयोजन करणे.

७) दृक्-श्राव्य संदेश : मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता संबंधित कार्यालयांनी संकेतस्थळे, आकाशवाणी, दूरदर्शन, खाजगी दूरचित्रवाहिन्या, एफ एम रेडिओ, स्थानिक केवल नेटवर्क, फेसबुक, व्हाट्सअप इत्यादी आधुनिक प्रसारमाध्यमातून याबाबतचे दृकश्राव्य संदेश प्रसारित करणे.

८) कार्यप्रवण व्यक्तींचा गौरव / सत्कार करणे : मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन यासाठी विविध मार्गांनी स्वयं प्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्ती / संस्था / यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी गौरव / सत्कार करणे.

९) टंकलेखन :  टंकलेखन करिता युनिकोड मराठीचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहित करणे.

१०) साहित्य संमेलन : डिजिटल साहित्य संमेलनाचे आयोजन.

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे इंग्रजी

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 1

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 2

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 3

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण संस्कृत

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक इंग्रजी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये

🇮🇳  भारतीय राष्ट्रध्वज ध्वजसंहिता

🇮🇳  आपल्या राष्ट्रध्वजाची ओळख

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

🇮🇳  MP3 देशभक्तीगीते डाऊनलोड

🇮🇳  MP3 स्वागतगीते डाऊनलोड

🇮🇳  प्रजासत्ताक फलक लेखन नमुने

🇮🇳  प्रजासत्ताक दिन रांगोळी नमुने

🇮🇳  हिंदी देशभक्ती शायरी १

🇮🇳  हिंदी देशभक्ती शायरी २

🇮🇳  मराठी देशभक्तीगीते pdf डाऊनलोड

🇮🇳  हिंदी देशभक्तीगीते pdf डाऊनलोड

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

Previous Post Next Post