नमस्कार मित्रांनो...

मी तुमच्या देशाचा झेंडा तुमचा तिरंगा बोलतोय. मी बोलतोय म्हणून काही लोक घाबरतील पण काही गोष्टींची जाणीव करून द्यायची होती, म्हणून बोलतोय. तुम्ही मला विकत घेता, कोणी हातावर बांधायला तर कोणी शर्टवर लावायला. नाही घ्या तुम्ही विकत, त्याला माझी हरकत नाहीच, पण मला सन्मानाने, मानाने वागणूक देऊन जपू शकाल ना?

DOWNLOAD PDF HERE

नाहीतर आज हृदयाजवळ आणि उद्या कुठेतरी कोपऱ्यात, रस्त्यावर टाकण्यासाठी माझा वापर व्हायला नको. एक नेहमी लक्षात ठेवा मी आकाशात गर्वाने फडकतोय, कारण सीमेवर कित्येक जण रोज आपल्या रक्ताने मला सलामी देत आहे. त्यांच्या त्यागाला तुम्ही कधीही विसरू नका.

देशभक्तीचा देखावा करणारे व माझ्यावर खरे प्रेम करणारे लोक मी  या तिरंग्याचा फोटो एक दिवस स्टेटसला लावण्यापेक्षा त्याचा विचार मनात कायमचा रुजवा आणि नेहमी लक्षात ठेवा की स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, सुखदेव व राजगुरू अशा कित्येकांच्या बलिदानातून आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. त्यांच्या बलिदानाला व तिरंग्याला कधीही डाग लागू देऊ नका.

म्हणूनच आज हा तिरंगा तुमच्याशी मनापासून बोलतोय व स्वतंत्र भारतात दिमाखाने फडकतोय.

मित्रांनो, शेवटी जाता जाता एवढेच सांगतो की सूर्यापेक्षाही तळपणारा मी, नदीच्या प्रवाहापेक्षाही खळखळणारा मी, हिमालयाच्या शिखरावर फडकणारा मी, धुक्यातूनही दिसणाऱ्या दवबिंदूतला मी! आणि प्रत्येक सैनिकाच्या बलिदानाचा साक्षीदारही मीच आहे.

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, धन्यवाद!!

!! जय हिंदी, जय महाराष्ट्र !!

व्हिडिओ पाहा👇

निर्मिती : निता बोढरे-दारुंटे

  Copyright Disclaimer  

वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.

सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

--------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

--------------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

--------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

--------------------------------

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

Previous Post Next Post