स्वातंत्र्य दिन मराठी भाषण
स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो.
विशेष पर्वणीला, जुलमी R राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.
१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली. १५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, धन्यवाद !
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
------------------------------