स्वातंत्र्य दिन मराठी भाषण

स्वातंत्र्य दिन उत्सव | 15 ऑगस्ट भाषण 5 | 15 ऑगस्ट छोटी मराठी भाषणे | स्वातंत्र्य दिन मराठी भाषण | स्वातंत्र्य दिन माहिती | 15 August Marathi Speech

भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे.

या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

१७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजान्ने आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमारानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली.

१८८५ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना झाली. २० व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी अहिंसा बाळगत चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचेनेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेस ने संपूर्ण स्वराज्य ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी हि तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली.

१९३० साली काँग्रेस ने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्य साठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना केली.

दुसऱ्या महायुद्ध नंतर ब्रिटिशांना लक्षात आले कि आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकार्यांचा जोर वाढत होता. हि गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली.

दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण जाताजाता त्यांनी भारतावर अजून एक घाव घालत भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे पाडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक शिख माणसांना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीर चा प्रश्नही पुढे आला.

स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताचे संविधान तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाट होता.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू तर पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून संबोधण्यात आले.

भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. राजधानी दिल्ली मध्ये राजपथावर सैन्यदले परेड करतात. त्यादिवशी बहुतांश रेडीओ चैनल तसेच दूरदर्शनवर देशभक्ती विषयी गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

 --------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

Previous Post Next Post