नजर माझी शोधते तुम्हा

घेऊनी नयनी आनंदाची गंगा

कारण स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवात

हिंदुस्तान फडकवतोय घराघरात तिरंगा

DOWNLOAD PDF HERE

होय... मी स्वतंत्र भारत देशाचा तिरंगाच बोलतोय. आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे आपल्या देशाची आन बाण आणि शान आहे.

केवळ मी डौलात डोलावा म्हणून आपला जीव ओतणारे स्वातंत्र्यवीर आपली मुले बायका, माता-पिता, घरदार सोडून देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या वीरांनी धगधगत्या अग्निकुंडात उड्या घेतल्या.

आणि हे सर्व का? तर तिरंगा मानाने आकाशात फडकावा म्हणून. माझ्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये अथवा हेटाळणी होऊ नये म्हणून तीनही दलातील सैन्य डोळ्यात तेल घालून भारताचे रक्षण करत आहेत.

पण आज माझे मन जरा निराशे कडे वळू लागले आहे त्याचे कारण म्हणजे आजची युवा पिढी कारण युवा पिढीच्या खांद्यावर उद्याच्या भारताची भिस्त आहे.

अहो १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला लागून सुट्टी आली तर ही युवा पिढी फक्त पिकनिकचा विचार करतात. " अरे छोड दो झेंडावंदन, आज हम पिकनिक मनायेंगे” यासारखी वाक्य ऐकली की, माझी तळपायाची आग मस्तकात जाते. असा माझा होत असलेला अपमान बघून मनाला फार यातना होतात.

एक नेहमी लक्षात ठेवा मी आकाशात गर्वाने फडकतोय कारण सीमेवर कित्येक जण रोज आपल्या रक्ताने मला सलामी देत आहे त्यांच्या त्यागाला कधीच विसरू नका.

शेवटी एवढेच सांगतो की, माझी मान सदैव उंचावेल अशीच कृती करा. कारण माझ्यात लपेटून मरण्याचे सौभाग्य प्रत्येकाला मिळत नाही ते त्यालाच मिळते जो माझ्यासाठी, माझ्या मानासाठी व माझ्या गर्वासाठी आयुष्य देतो!

म्हणून म्हणावेसे वाटते की... "विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा”

चला मग मित्रांनो येतो बर का...!

धन्यवाद!!

!! जय हिंदी, जय महाराष्ट्र !!

व्हिडिओ पाहा👇

निर्मिती : निता बोढरे-दारुंटे

  Copyright Disclaimer  

वरील माहिती स्वनिर्मित असून विद्यार्थी व शिक्षक सहकार्य हेतूने देण्यात आली आहे.

सदर माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

--------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

--------------------------------

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

--------------------------------

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

--------------------------------

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

Previous Post Next Post