मराठी आमुची मायबोली

मराठी भाषा अतिशय लवचिक आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द आहेत. यामुळेच मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी ती दर बाराकोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतो. तिचे हेल वेगळे होतात. मराठीत अनेक पोटभाषा आहेत. जळगाव, धुळे आणि नाशिक येथे अहिराणी, पूर्व खानादेशात खानदेशी, विदर्भात वऱ्हाडी किंवा विदर्भी, कोकणात कोकणी तर गोव्यात कोंकणी भाषा बोलली जाते. पराभी, कोळी, किरिस्ताव, कुणबी, आग्री, ठाकरी, बाणकोटी, मावळी, मालवणी, अशा अनेक भाषा कोकणी भाषेत येतात. नायगाव, वसई, डहाणू भागात वडवली बोलली जाते. नालासोपारा आणि विरार भागांत सामवेदी बोलली जाते. दक्षिण भारतात तंजावर मराठी, नामदेव मराठी आणि भावसार मराठी बोलली जाते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर डांगी भाषा बोलली जाते. अशी ही मराठी भाषा नुसती भारतातच नव्हे तर मौरिशस आणि इस्रायलमध्येही बोलली जाते.

आता गंमत अशी आहे की ही भाषा दर पंचवीस किलोमीटरवरवेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषाखणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, "आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!" साताऱ्याला भाषा थोडी नरम होते. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या तंबाखूची गुंगी त्यात डोकावते. तरी पण "लई" "चिक्कार" `आयला' वगैरे म्हणजे खा सातारी ढंग! कोकणात हीच मराठी अगदी मऊ होते.

मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून तर तिचे व्याकरण आणि वाक्य रचना प्राकृत आणि पालीपासून तयार झाले आहे. काळ बदलला तसे मराठी भाषेत अनेक बदल झाले आहेत. मराठी भाषेत अरबी, फारशी, कानडी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांतले शब्द आले आहेत.

आज इंग्रजीला फार महत्त्व आहे. यात कोणाला दोष द्यायचा? कारण महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होते. पदव्या मिळवून तरुण मंडळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. तिथे इंग्रजी भाषाच बोलावी व लिहावी लागते.

असो.. पण म्हणून आपण आपल्या मातृभाषेला विसरून जायचे का? परभाषा जरी अवगत झाली तरी आपल्या मराठीला विसरु नका. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता-वाचता आली पाहिजे. आपल्या मराठीतसुद्धा खूप विषयांवर लेखन झाले आहे. शास्त्र विज्ञान, ललित साहित्य खूप आहे. त्याचा उपयोग करू या, आपल्या ज्ञानात वाढ करू या ! म्हणून मराठीत फक्त बोलू नका तर लिहूनही ही भाषा आणखी समृद्ध करुया.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे इंग्रजी

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 1

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 2

🇮🇳  मी तिरंगा बोलतोय भाषण 3

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण मराठी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषणे हिंदी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी

🇮🇳  प्रजासत्ताक दिन भाषण संस्कृत

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक इंग्रजी सूत्रसंचालन

🇮🇳  प्रजासत्ताक मराठी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक हिंदी प्रास्ताविक

🇮🇳  प्रजासत्ताक दिन घोषवाक्ये

🇮🇳  भारतीय राष्ट्रध्वज ध्वजसंहिता

🇮🇳  आपल्या राष्ट्रध्वजाची ओळख

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

🇮🇳  MP3 देशभक्तीगीते डाऊनलोड

🇮🇳  MP3 स्वागतगीते डाऊनलोड

🇮🇳  प्रजासत्ताक फलक लेखन नमुने

🇮🇳  प्रजासत्ताक दिन रांगोळी नमुने

🇮🇳  हिंदी देशभक्ती शायरी १

🇮🇳  हिंदी देशभक्ती शायरी २

🇮🇳  मराठी देशभक्तीगीते pdf डाऊनलोड

🇮🇳  हिंदी देशभक्तीगीते pdf डाऊनलोड

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

Previous Post Next Post