मराठी भाषेचा जन्म नेमका कोणत्या भाषेपासून झाला आहे ? याबद्दल अनेकांची वेगवेगळी मत - मतांतरे आहेत. कोणी म्हणतात वैदिक संस्कृती पासून, कोणी म्हणते संस्कृत पासून कोणाला वाटते प्रकृतापासून तर कोणी म्हणते अपभ्रंशापासून !
यासाठी ताम्रपट, शिलालेख, त्याचबरोबर दुर्मिळ असणाऱ्या ग्रंथांमध्ये असलेले ऐतिहासिक उल्लेख, प्राचीन कोरीव लेख, या साधनांचा अभ्यास भाषाभ्यासकांनी केला आणि त्यातूनच मराठी भाषेच्या उत्पत्तीचा काळ शोधण्याचा प्रयत्न केला.
ज्याने त्याने आपापल्या कडे असणारे पुरावे दाखवून आपली बाजू कशापद्धतीने बरोबर आहे ते पटवून दिलेलेच आहे, कारण वैदिक संस्कृत, पाली, प्राकृत या भाषांशी मराठीचे काहीशे सारखेपणा दिसून येते. त्यामुळे त्या अभ्यासकांकडे असणाऱ्या माहितीच्या आधारे आपली बाजू मांडली आहे. कुठलीही भाषा बदलत जाणारी असते, त्यात बदल हे निश्चित होतच असतात. ज्या वेळेला त्या विशिष्ट भाषेत साहित्य तयार होते त्याचवेळी त्या भाषेला व्याकरणाच्या साच्यामध्ये बसवले जाते. तेंव्हा कुठेतरी ती भाषा स्थिर स्थावर होते. जर कधी बोली भाषेची जोड त्या भाषेला मिळाली नाही तर, ती भाषा सामान्य माणसाला आपलीशी कधीही वाटणार नाही. कालांतराने बोली भाषा सुधारत जाऊन वेगवेगळ्या शब्दांची उत्पत्ती होत जाते. म्हणूनच तर प्रत्यर्क कालखंडात भाषा बदलत गेलेली आपल्याला जुन्या आणि नवीन साहित्यांमधून दिसतच आहे ! ते प्रत्येक जण समजू शकतो.
आर्य भारतीय भाषेत हळूहळू बदल होत जाऊन ती संस्कृत त्यानंतर प्राकृत आणि अपभ्रंश मग शेवटी मराठी अशी साधारण उत्पत्ती झालेली दिसून येते.
त्यामध्ये काही अभ्यासकांच्या मतानुसार मराठी भाषेच्या जन्मा अगोदर चार ते पाच शतकं शंकराचार्यांनी वैदिक धर्माला पुनर्जीवन दिल्यामुळे साहजिकच संस्कृतला, संस्कृतातील धार्मिक, तात्विक वाङमयाला महत्व मिळाले. परत संस्कृतात ग्रंथरचना होण्याला सुरुवात झाली. यामुळे याच काळातील अपभ्रंशाच्या बदलावर संस्कृत भाषेचाही परीनाम झाला असावा. त्यानंतर पाहिले तर अपभ्रंश भाषा साधारणतः अकराव्या शतकापर्यंत असलेली जाणवते. त्यापूर्वी काही शतके अपभ्रंश भाषेत काही महत्वपूर्ण प्रवृत्तीतून पालट होण्याला सुरुवात झाली होती. त्याचे कारण असे होते की अकराव्या शतका अगोदर एक दोन शतके म्हणजे इसवी सन 8 व्या शतकापासून रबडी वेग वेगळ्या धर्माच्या वेगळ्या वंशाच्या तसेच विविध भाषिकांनी भारत देशावर ( हिंदुस्थान ) झाल्या त्याच्यामध्ये पाहायला गेले तर, इ.स. आठव्या शतकामध्ये अरब, इ.स. अकराव्या शतकापर्यंत ते भारतात स्थिर स्थावर झाले. एकूणच 8 - 9 व्या शतकापासून साधारण ११ व्या शतकापर्यंत या आक्रमण केलेल्या विभिन्न वंशाच्या, विभिन्न समाजाच्या भाशिक संकटांमधून अपभ्रंश भाषेला सुरुवात झाली. अपभ्रंश भाषेचे हे एक मोठे अवस्थांतरच होत होते. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित आहे. परंतु आजही मराठी अभ्यासकांमध्ये आजही मराठी भाषेच्या उत्पत्ती संदर्भात अनेक मतभेद आहेत.
संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे मराठी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे हिंदी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन छोटी भाषणे इंग्रजी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषणे हिंदी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषण इंग्रजी
🇮🇳 प्रजासत्ताक दिन भाषण संस्कृत
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक मराठी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक हिंदी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक इंग्रजी सूत्रसंचालन
🇮🇳 प्रजासत्ताक मराठी प्रास्ताविक
🇮🇳 प्रजासत्ताक हिंदी प्रास्ताविक
🇮🇳 भारतीय राष्ट्रध्वज ध्वजसंहिता
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
🇮🇳 प्रजासत्ताक दिन रांगोळी नमुने
🇮🇳 मराठी देशभक्तीगीते pdf डाऊनलोड
🇮🇳 हिंदी देशभक्तीगीते pdf डाऊनलोड
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/
┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉