महात्मा गांधी मराठी भाषणे | गांधी जयंती भाषणे | Mahatma Gandhi Marathi Speech | गिरीश दारुंटे मनमाड | Girish Darunte Manmad

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले उमेदीचे संपूर्ण आयुष्य वेचले, अश्या थर नेत्यान मध्ये महात्माजींचे स्थान वैशिष्टयपूर्ण आहे. इंग्रजीराज्याला विरोध करण्यासाठी अनेकांनी अनेक मार्ग स्वीकारले कोणी शस्त्र बळाने तर कोणी शब्द बळाने इंग्रजस्ताधीशायांना वीरोध केला. पण महात्मा गांधींनी सत्याग्रहाने इंग्रजांना नमविले. त्यासाठी जनमत तयार करण्यावर त्यांचा भर होता. समाजात जी जागृतीनिर्माण केली त्यात देश्याभिमान आणि त्याग यांना महत्व होते. त्यांनी स्वत:जीवन त्या दृष्टीने घडविले होते.

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ मध्ये पोरबंदर येथे झाला त्यांनी ब्यरिष्टर पदवी पर्यंत शिक्षण घेतले. त्यातच त्यांनी ऑफ्रिकेत वर्णभेदाचा अनुभव घेतला. गोऱ्या इंग्रजांनी कृष्णवर्णीयांना एवढ्या वाईट रीतीने वागवायचे कि जणू ते कोणी गुलामच होते. तेच त्यांनी ऑफ्रिकेत अनुभवले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्यांनी बसायचे हे गोऱ्यांनी ठरवायचे! गांधींनी याविरुद्ध अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग स्वीकारून विरोध व्यक्त केला. ऑफ्रीकेतून परततांना त्यांनी अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी झगडण्याचा निश्चय केला होता.

गांधीजी भारतात आल्या नंतर त्यांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याशी संपर्क साधून भारतातील परिस्थिती समजावून घेतली. सर्वत्र प्रवास करून प्रत्यक्षात त्या परिस्थितीचा अनुभव घेतला. माणसाने माणसांना मानुसकिनेच वागवावे हेच सूत्र सर्वांना समजावणे आवश्यक असल्याचा निर्णय त्यांनी घेतला. समाजातल्या उच्च-निच्च, धनवान लीद्री, सुशिक्षित - असुशिक्षित, मालक मजूर, स्त्री पुरुष अश्या - भेदा मधली दुरी कमी करने हेच प्राथमिक काम प्रथम करण्याचे ठरविले. त्याच बरोबर इंग्रजांच्या

देशविघातक जुलमी धोरनांना विरोध करतांना अहिंसा, सत्याग्रह या साधनांचा वापर करण्याचा निश्चय केला. भारताती तत्वज्ञान, जीवनपद्धती यांच्या वरील सखोल चिंतनाने त्यांचे जीवन भारावले गेले. आश्रम-जीवन, स्वावलंबन, अन्न वस्त्रे यांच्या गरजा कमी करणे, साधी राहणी, आत्मशुद्धी, मानवतावादी विचारसरणी अश्या अनेक बाबींवर ते विचार करीत राहिले. परावलंबनाने भारताची आर्थिक कुचंबना होत आहे, इंग्रज सरकार भारतीयांना विदेशी मालाचे प्रलोभन दाखवून लुबाडते आहे, या विषयी विचार केल्यावर त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वत:सूतकताई, गरजे पुरती वस्त्रे स्वालंबन, आश्रम-जीवन, यांचा स्वीकार करून 'बोले तैसा चाले' हा आदर्श त्यांनी जनते समोर ठेवला. एक पंचा, एक उपरणे, साध्या चपला अशा त्यांच्या दर्शनामुळे जनतेला आदरणीय आदर्श नेता वाटू लागले राष्ट्राला स्वातंत्र्यासाठी कोणत्या मार्गाने जायला हवे या विषयात लक्ष घालून त्यांनी स्पृश्य अस्पृश्य, हिंदू- मुसलमान, या सर्वावर भारतीय तत्वांची भावना निर्माण 

करून ऐक्य साधले पाहिजे असा प्रचार केला. त्यांच्या भाषणांतून लीखांनातून आणि प्रार्थनासभांतून हीच शिकवण ते देत राहिले. जनतेने त्यांना 'महात्मा' हि उपाधी दिली. तसेच त्यांना ' राष्ट्रपिता' म्ह्नवूनही गौरविले. गांधीजींच्या कोनत्याहि आंदोलनात त्यामुळेच जनता त्यांच्या सोबत राहिली.

इंग्रजांनी केलेल्या जुलमी कायद्यांना विरोध करण्यात गांधीजी अभागी असत. १९१९ मद्ये रौलट कायद्या विरूद्धचे आंदोलन, चंपाअरण्यातील शेतकर्यावरील अन्याया विरुद्ध सत्याग्रह, अलाहाबादच्या गिरणी कामगारांसाठी उपोषण, असहकारीतेची चळवळ, हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी केलेले २१ दिवसांचे उपोषन, भारतातल्या मिठावर लादलेल्या कराविरुद्ध, १९३० ची दांडीयात्रा इ. उदाहरणे त्यांच्या कृतीची कल्पना देणारी आहेत. त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. इंग्रजांनी पुढे केलेल्या स्वार्थी योजनांना गांधीजींनी प्रखर विरोध केला.

आपली पूर्ण विचारांनी बनवलेली मते त्यांनी स्व:त आचरणात आणली पण ती ईतरांवर लादली नाहीत. हृद्य परिवर्तनाने जेवढे साधेल तेवढेच टिकाऊ ठरेल अशी त्यांची धारना होती. दारूबंदी, हिंदीचा प्रचार, स्वच्छता मोहीम, शिक्षणाची योजना, हरिजनांच्या उद्धाराचे प्रयत्न, ग्रामजीवनाच्या उन्नतीचे प्रयत्न, अश्या अनेक समाजहित साधणार्या कार्याचा ते सतत पाठपुरावा करीत राहिले. त्यांची प्रार्थनासभा म्हणजे समाजशिक्षणावरील प्रवचने असे. म्हात्मा गांधींचे कट्टर अनुयायी विनोबा भावे यांनी गांधीजींच्या उपदेश्याचे, सत्याग्रही- व्रताचे दिग्दर्शन या प्रमाणे केले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, स्वदेशी, भयवर्धन, सर्वधर्मी, समानत्व याप्रमाणे होय.

महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्वाने, आचरणाने, शिकवणुकीने, आनि प्रत्यक्ष कार्याने प्रभावित झालेली जनता स्वातंत्र्यॊत्सुक बनली. हि निश्चिती झाल्यावर गांधीजींनी इंग्रजांना १९४२ मध्ये 'चले जाव' असे ठणकावून सांगितले. या घोषणेने संपूर्ण भारतात एक मोठी चळवळ निर्माण झाली. गांधीजीसह अनेक थोर नेते सरकारने तुरुंगात पाठविले. पण जनतेने माघार घेतली नाही उलट हे आंदोलन तीव्र केले. ठिकठीकाणी धरपकड, लाठीमार, गोळीबार करून इंग्रजांनी हि चळवळ दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर इंग्रजांना १९४७ मध्ये भारत सोडून जावेच लागले. आणि भारत स्वतंत्र झाला. सत्याग्रही गांधीजींच्या विच्यारात केवळ माणुसकी, शब्द पाळणे, अहिंसात्मक लढा देणे, यांना महत्व होते. काहींना हे विचार पटत नव्हते. देश्याची फाळणी झाली ती अश्या गुळगुळीत धोरणांनीच अशी समजूत असलेल्यांनीच गांधींच्या विचारांचा निषेध केला. आणि या वैच्यारिक संघर्षनातूंच महात्माजींची ३० जानेवारी १९४८ रोजी हत्या करण्यात आली. पण मृत्यू समयी त्यांच्या मुखातून ' हे राम' हे उद्गार काढून त्यांनी हे जग सोडले.

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

------------------------------

इतरही उपयुक्त माहिती

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड

📲 संपूर्ण MP3 परिपाठ डाऊनलोड

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.

🎼 ध्यास आमुचा गुणवत्ता

🎼 सुंदर माझी शाळा गं

🎼 देवा मला शाळेत जायचं हाय 

🎼 आनंदाची शाळा आमची

🎼 आली पारू शाळेला

🎼 तू बुद्धी दे तू तेज दे

🎼 बलसागर भारत होवो

🎼 हा देश माझा याचे भान...

🎼 हीच आमुची प्रार्थना

🎼 नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा 

🎼 घंटी बजी स्कुल की

🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु 

🎼 इतनी शक्ती हमे दे ना दाता

🎼 स्कुल चले हम 1

🎼 स्कुल चले हम 2

🎼 वंदे मातरम

🎼 राष्ट्रगीत

┉┅━━━━━━•❀•━━━━━━┅┉

📲 शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9

📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/

Previous Post Next Post