कार्यानुभव नोंदी
१) निरनिराळ्या प्रार्थनांचा संग्रह करून चालीवर म्हणतो.
२) वर्तमानपत्र नियमित आवडीने वाचतो.
३) परिसरातील व्यावसियाकांशी त्यांच्या व्यवसायाबद्दल गप्पा मारतो.
४) उद्योगधंदाच्या भेडीच्या वेळी जिज्ञासेने व उत्सुकतेने माहिती विचारतो.
५) थोर व्यक्तिच्या पुण्यतिथी व जयंती कार्यक्रमात आवर्जून भाग घेतो.
६) थोर व्यक्तिविषयी सादरभावाने बोलतो.
७) स्वतः बालसभांचे आयोजन करतो.
८) विशिष्ट दिनांचे दिनविशेष सांगतो.
९) पर्यावरण विषयक कार्यक्रमात आवर्जून भाग घेतो.
१०) शालेय कार्यक्रमात स्वयंशिस्तीने वागतो.
११) शालेय स्वच्छतेबाबत नेहमी जागरूक राहतो.
१२) शालेय स्वच्छतबाबत नेहमी जागरूक राहतो.
१३) वृक्षसंगोपनाच्या कार्यक्रमात नेहमी सहभाग असतो.
१४) जलप्रदुषण, वायुप्रदुषण, ध्वनीप्रदुषणाबाबत नेहमी जागरूक असतो.
१५) प्लॅस्टिकचा अति वापराबाबतचे तोटे समजावून सांगतो.
१६) पावसाबद्दल /पाण्याबद्दलच्या गीतांचा संग्रह करतो.
१७) पिण्याच्या पाण्याबद्दल नेहमी काळजी घेतो.
१८) श्रम आणि कौशल्यावर आधारित कामे आवडीने करतो.
१९) श्रमजीवीलोकांबद्दल आदराची भावना ठेवतो.
२०) नैसर्गिक आणि सामाजिक आंतरप्रक्रियेची जाणीव आहे.
२१) पर्यावणाविषयी समस्या दूर करण्याचे उपाय शोधतो.
२२) मिळालेल्या माहितीचा उपयोग व्यवहारात करतो.
२३) कुटुंबाच्या गरजा ओळखून कुवतीनुसार सहकार्य करतो.
२४) परिसरातील उत्पादक उपक्रमांची ओळख करून घेतो.
२५) सांघिक काम करण्याची मनापासून आवड आहे.
२६) वर्तमानपत्रातील उपयुक्त माहितीची कारणे संग्रही ठेवतो.
२७) वर्गसजावटीत उत्साहाने भाग घेतो.
कला नोंदी
२८) भारतीय संगिताची वैशिष्ठये समजून घेता.
२९) संगिताच्या कार्यक्रमांच्या श्रवणाचा आनंद उपभोगतो.
३०) दूरदर्शन / रेडिओवर संगिताचे निरनिराळे कार्यक्रम उपभोगतो.
३१) जमेल तसे चित्रण आत्मविश्वासाने करतो.
३२) स्वतःची कल्पना वापरून छानदार कल्पनाचित्र तयार करतो.
३३) मनातील स्वैर कल्पनांचा वापर करून मुक्त चित्र काढतो.
३४) विविध वापर करून सजावट करतो.
३५) विविध प्रकारचा कागद वापरून मुखवटे तयार करतो.
३६) मासिकातील रंगीत चित्रे जमवून कोलाज बनवितो..
३७) मातीपासून सफाईदारपणे वस्तु प्राणी पक्षी इ.बनवितो.
३८) रंगाचा वापर करून कल्पकतेचे मुद्राचित्र बनवितो.
३९) पाहिलेल्या चित्रांचे रेखांकन करतो.
४०) भाषेतील मुळाक्षरांच्या ध्वनीचे उच्चारण ओळखतो.
४१) दिलेल्या प्रसंगावर मुकाभिनय करतो.
४२) दोन वस्तुंचा आघात करून ताल ध्वनी काढून लय व ताल धरतो.
४३) नृत्याच्या पूर्वतयारीसाठी हातापायाच्या हालचाली करून सराव करतो.
४४) परिसरातील लोकगीते आवडीने म्हणून दाखवितो.
४५) दोऱ्याचा/सुतळीचा वापर करून सुंदर मुद्राचित्र तयार करतो.
४६) सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संघाचे नेतृत्व करतो.
४७) निरनिराळ्या गीतांचा संग्रह करतो.
४८) सुचविलेल्या विषयाची नक्कल करून दाखवितो.
४९) नाट्यछटेसाठी आवश्यक ती कथानके शोधतो.
५०) दैनंदिन घडामोडीतून नाट्यप्रसंग निवडतो.
५१) प्रसंगाचे अपूर्ण कल्पना करून पूर्ण करतो.
५२) नाट्यमय प्रसंगाचा अनुभव घेतो.
५३) कल्पनाशक्ती व अभिव्यक्तीकारा इतरांपर्यंत पोचतो.
५४) योग्य त्या तालावर मुक्तपणे हालचाली करून भाव व्यक्त करतो.
५५) प्राणी पक्षी मानवाकृती पाने फुले यांचे सहज व सोपे रेखांकन करतो.
५६) अंकातून अक्षरातून चित्र निर्माण करतो.
५७) काल्पनिक घटनेवर आधारित चित्रे काढतो.
५८) स्वतःच्या कल्पनेने काल्पनिक दृश्ये रेखाटतो.
५९) पंचतंत्रावर आधारित प्रसंगांची चित्रनिर्मिती करतो.
६०) मानवनिर्मित चित्रांचे रेखाटन करतो.
६१) निसर्गनिर्मित उपलब्ध शब्द वस्तु सुट्टया मांडून चित्रनिर्मिती करतो व रंगवतो.
६२) एकाच आकाराची पुनरावृत्ती करून अथवा तो आकार उलट सुलट करून संकल्पचित्र तयार करतो.
६३) निसर्गातील पाने फुले व पक्षांचा वापर करून नैसर्गिक संकल्पचित्र निर्मिती करून आकर्षक रंग भरतो.
६४) भौमितिक आकाराचे चित्र काढून रंग भरतो.
६५) विविध वस्तुंचे सुशोभीकरण करतो.
६६) परिसरातील माध्यमे वापरून संकल्पचित्र तयार करतो.
६७) चित्रात रंग भरताना स्वकल्पनांचा वापर करतो.
६८) रंगीत कागदापासून प्राणी व पक्षी यांचे मुखवटे बनवितो.
६९) उपलब्ध मातीपासून भौमितिक आकार बनवितो.
७०) मातीच्या स्लॅबर मातीच्या वळ्या, गोल, मातीचे मणी चिकटवून उठावाचे अलंकरण करतात.
७१) घनाकार संयोजनातून परिचयाच्या वस्तु, प्राणी पक्षी, फळे, भांडी तयार करतो.
७२) पोतयुक्त पृष्ठभागावर कागद ठेवून उसे घेतो.
७३) कागदावर रंग टाकून फुंकर मारून घडी घालून ठसे उमटवतो.
७४) पेन्सिलीस दोरा गुंडाळून ती पेन्सिल कागदावर फिरवून चित्रनिर्मिती करतो.
७५) कांदा, भेंडी, बटाटा काप, रंगात बुडवून मुद्राचित्र करतो.
७६) निरनिराळ्या प्रकाराची अभिनयाची प्रात्यक्षिके करून दाखवितो.
७७) निरनिराळ्या प्रकारच्या शास्त्रीय नृत्याची माहिती करून घेतो.
७८) हातांच्या मुद्रांचे प्रात्यक्षिक आत्मसात करतो.
७९) शास्त्रीय नृत्यासाठी तालाच्या ज्ञानाची माहिती मिळवतो.
८०) हातांच्या शिस्तबध्द हालचाली व पायांचे आघात यांचा लय तालाशी संवाद साधतो.
८१) नृत्य हालचाली आणि उपलब्ध रंगभुमीची जागा यांची जाण निर्माण होत आहे.
८२) अभिनयाच्या निरनिराळ्या प्रकारांची माहिती करून घेतो.
८३) पायांच्या आघातातून नृत्याच्या तालाचा सराव करतो.
८४) हातापायांच्या हालचाली तालात होण्यासाठी निरनिराळ्या प्रात्यक्षिकांचे निरीक्षण करतो.
८५) उपलब्ध जागेनुसार रंगभुमीचा वापर करण्याची सवय लागते.
८६) मित्रांना प्रसंगनाट्य शिकतो.
८७) एखादी कथा साभिनय सादर होत असतांना निरीक्षण करतो.
८८) नाट्यातील संवाद स्मरणात ठेवतो.
८९) नाट्य सादर करतांना समुहातील एकमेकांशी संवाद साधतो.
९०) कल्पकतेने आपापसात संवाद साधून नाट्य सादर करतो.
९१) समक्ष विद्यार्थ्यांना कलाविस्कार करण्यास प्रोत्साहन देतो.
९२) शास्त्रीय नृत्यप्रकाराची रूपरेषा स्पष्ट करतो.
९३) दीर्घ श्वसन, ॐ कार नियमित करतो.
९४) शास्त्रीय नृत्याविषयीचे ज्ञान व जान हळुहळु वाढीस लागत आहे.
९५) पायांच्या आघातातून ताल काढण्याचा सराव वाढवा आहे.
९६) नवीन नृत्याच्या हालचाली शिकण्यास नेहमी अग्रसर असतो.
९७) कथा-कथानक, नाट्य-नाट्यीकरण यातील फरक समजतो.
९८) साभिनय सांगितलेल्या कथेचे नाट्यीकरण करतो.
९९) नवीन विषयावर नाट्यछटा सादर करतो.
१००) वाद्य वर्गाचा स्थुल परिचय करून घेतो.
संकलन : गिरीष दारुंटे, मनमाड (नाशिक)
------------------------------
📲 मराठी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
📲 इंग्रजी परिपाठ सूत्रसंचालन डाऊनलोड
------------------------------
प्रार्थना व गीते ऐका व डाऊनलोड करा.
🎼 सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभु
------------------------------
https://t.me/+yQJWpHBZo79iMmM9
📲 शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻https://www.facebook.com/dnyanjyoti.savitribai.educationalpage/