कुसुमाग्रज जीवन प्रवास | वि वा शिरवाडकर माहिती | राजभाषा दिन माहिती | Kusumagraj Mahiti

कुसुमाग्रज जीवन प्रवास

२७ फेब्रुवारी १९१२ : पुणे येथे जन्म

नाव : गजानन रंगनाथ शिरवाडकर

दत्तक विधान व नामांतर : विष्णु वामन शिरवाडकर

१९१९ - २४ : प्राथमिक शिक्षण - पिंपळगांव बसवंत

१९२४- २९ : माध्यमिक शिक्षण - नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूल (आत्ताची जु. स. रुंगठा हायस्कूल, नाशिक)

१९२९ : बालबोधमेवा (संपादक - दे. ना. टिळक) मध्ये लेखन व कविता मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण मुंबई विद्यापीठ

१९३० : हं. प्रा. ठा महाविद्यालयात प्रवेश व 'रत्नाकर' मासिकात कवितांना प्रसिध्दी

१९३२ : काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभाग

१९३३ : धृव मंडळाची स्थापना, 'नवा मनू' मध्ये वृत्तपत्रीय लेखन

१९३४ : ' जीवन लहरी ' या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

बी. ए. परीक्षा उत्तीर्ण (मराठी इंग्रजी)

१९३६-१९३८ : गोदावरी सिनेटोनमध्ये प्रवेश, सती सुलोचना' कथालेखन व लक्ष्मणाची भूमिका

१९३८-१९४६ : वृत्तपत्र व्यवसाय, साप्ताहिक प्रभा, दैनिक प्रभात, सारथी, धनुर्धारी, नवयुग इत्यादी.

१९४२ : विशाखा काव्यसंग्रह प्रकाशित

१९४४ : विवाह. पत्नीचे नाव मनोरमा ( माहेरचे नाव गंगुबाई सोनवणी)

१९४६ : 'वैष्णव' पहिली कांदबरी. 'दूरचे दिवे' पहिले नाटक

१९४६-१९४८ : साप्ताहिक 'स्वदेश' संपादन

१९५० : लोकहितवादी मंडळ स्थापना, संस्थापक सदस्य, शालेय पुस्तकांचे संपादन

१९५६ : अध्यक्षपद मुंबई उपनगर साहित्य (मालाड )

१९५९ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सत्याग्रह

१९६० : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे ६२ व्या वार्षिक उत्सवाचे अध्यक्षपद

१९६० : राज्य पुरस्कार 'मराठी माती' (काव्यसंग्रह)

१९६२ : राज्य पुरस्कार स्वगत' (काव्यसंग्रह)

१९६४ : राज्य पुरस्कार 'हिमरेषा' (काव्यसंग्रह)

१९६४ : अध्यक्षपद, ४५ वे मडगाव (गोवा) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिवेशन

१९६४ : 'जीवनगंगा' नाशिक नगर पालिका शतसांवत्सरिक ग्रंथाचे संपादन

१९६६ : राज्य पुरस्कार 'ययाति आणि देवयानी' या नाटकास

१९६७ : राज्य पुरस्कार 'वीज म्हणाली धरतीला' नाटका

१९६४-१९६७ : पुणे विद्यापीठ विधी मंडळावर सदस्य

१९७० : अध्यक्षपद, मराठी नाटय संमेलन, कोल्हापूर

१९७१ : राज्य पुरस्कार 'नटससम्राट' नाटकास

१९६२-१९७२ : अध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, नाशिक

१९७२ : सौ. मनोरमाबाईंचे निधन

१९७४ : 'नटसम्राट' नाटकास साहित्य अकादमी पुरस्कार (ताम्रपट व पाच हजार रूपये)

१९८५ : अखिल भारतीय नाटयपरिषदेचा राम गणेश गडकरी पुरस्कार

१९८६ : डि. लिट् पुणे विद्यापीठ

१९८७ : अमृत महोत्सव

१९८८ : संगीत नाटयलेखन अकादमी पुरस्कार

१९८८ : ज्ञानपीठ पुरस्कार

१९८९ : अध्यक्ष, जागतिक मराठी परिषद, मुंबई

१९९१ : पद्मभूषण पुरस्कार

१९९६ : कुसुमाग्रज तारा

१० मार्च १९९९ : कुसुमाग्रजांचे निधन

२००३ : पोष्टाचे तिकीट प्रकाशन

संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक

Disclaimer : ब्लॉगवरील माहिती कोणत्याही वेबसाईटवर / युट्युब चॅनलवर कॉपी करू नये.

🔖 मराठी राजभाषा दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २७-फेब्रुवारी-मराठी-राजभाषा-दिन

↪️  कुसुमाग्रज-वि-वा-शिरवाडकर-परिचय

↪️  कुसुमाग्रज-जीवन-प्रवास

↪️  कुसुमाग्रज-साहित्य-निर्मिती

↪️  जन्म-मराठी-भाषेचा

↪️  मराठीची-बोलू-कौतुके

↪️  माझी-मातृभाषा-मराठी

↪️  मराठी-आमुची-मायबोली

↪️  मराठी-भाषा-गीत-डाऊनलोड

🔖 राष्ट्रीय विज्ञान दिन उपयुक्त माहिती

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

↪️  २८ फेब्रुवारी-राष्ट्रीय-विज्ञान-दिन

↪️  नोबेल-विजेते-सी-वी-रमन-परिचय

↪️  विज्ञान-म्हणजे-काय?

↪️  विज्ञान-हे-वरदानच

↪️  विज्ञानाची-वैशिष्ट्ये

↪️  MP3-विज्ञान-गीत-डाऊनलोड

📲  शैक्षणिक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई टेलिग्राम ग्रुप JOIN करा👇🏻

📲  शैक्षणिक ज्ञानज्योती सावित्रीबाई फेसबुक पेज JOIN करा👇🏻

Previous Post Next Post